मुंबई : हॉलिवूडचा प्रसिद्ध गायक जस्टिन बीबर सध्या रामसे हंट सिंड्रोम या आजारपणामुळे चर्चेत आला आहे. त्याच्या अर्ध्या चेहऱ्याला अर्धांगवायूचा झटका आलाय. त्याच्यावर सध्या तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सूरू आहेत. मात्र तुम्हाला अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या जस्टिन बीबरच्या आयुष्यातील या गोष्टी व त्याची संपत्ती माहितीय का? नाही ना मग जाणून घ्या.
जस्टिनचा जन्म 1 मार्च 1994 रोजी झाला. त्याच्या आईचे नाव पॅटी मॅलेट आणि वडिलांचे नाव जेरेमी जॅक बीबर आहे. जस्टिन आज जरी त्याच्या वडिलांच्या संपर्कात असला तरी त्याला त्याच्या आईनेच लहानाचं मोठं केलं आहे. विशेष म्हणजे, जस्टिनची आई लग्नाशिवाय गरोदर राहिली होती. प्रेग्नेंसी होममध्ये राहून तिने जस्टिनला जन्म दिला होता.
पॅटी मॅलेटने काही वर्षांपूर्वी तिच्या 'Nowhere but up: The story of Justin Bieber's Mom' या पुस्तकात तिची वेदना कथन केली होती. आई-वडिलांचा घटस्फोट, भावनिक गोंधळ, अध्यात्माकडे वळणे आणि नंतर आत्महत्येचा प्रयत्न, असे प्रसंग जस्टिनच्या आईने या पुस्तकात सांगितलेत.
जस्टिन दोन वर्षांचा असताना पॅटीला त्याचं गाण्यावर प्रेम असल्य़ाचं कळाल. या दरम्यान पॅटीने अनेक छोटी -मोठी काम करत, जस्टिनला एक चांगलं आयुष्य देण्याचा प्रयत्न केला.
आज जस्टिन बीबर एक जगात प्रसिद्ध सिंगर आहे. भारतातील तरूणाई त्याची गाणी गाते, थिरकते. जस्टिन अनेक शोसाठी मोठी रक्कम घेतो. एखाद्या देशात शो करण्यासाठी त्यांची किंमत खुप आहे.
आज जस्टिन करोडोंचा मालक आहे. त्याची बेव्हरली हिल्स, ओंटारियो, टोलुका लेक येथे मालमत्ता आहे. या सर्व मालमत्तांची किंमत ४० दशलक्ष डॉलर्स (भारतीय चलनानुसार ३०० कोटींहून अधिक) आहे.
दरम्यान चेहऱ्यावर आलेल्या अर्धांगवायूच्या झटक्यामुळे तो सध्या कठीण काळातून जातोय. तो लवकरच या आजारावर मात करेल अशी अपेक्षा चाहत्यांना आहे.