अनुष्कामुळे 'ते' क्षण खास ठरले - विराट कोहली

कसोटी क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात असो की टीम इंडियाचा कॅप्टन होण्याची बातमी असो, अनुष्का नेहमीच माझ्यासोबत राहिलीये आणि माझ्यासाठी ती कायम लकी ठरलीय, असं म्हणतोय टीम इंडियाचा 'द मोस्ट पॉप्युलर' क्रिकेटर विराट कोहली... क्रिकेटचं मैदान गाजवणारा विराट सध्या बॉलिवूड गाजविणाऱ्या अनुष्कावर भलताच फिदा झालाय. 

Updated: Jun 13, 2017, 05:34 PM IST
अनुष्कामुळे 'ते' क्षण खास ठरले - विराट कोहली title=

मुंबई : कसोटी क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात असो की टीम इंडियाचा कॅप्टन होण्याची बातमी असो, अनुष्का नेहमीच माझ्यासोबत राहिलीये आणि माझ्यासाठी ती कायम लकी ठरलीय, असं म्हणतोय टीम इंडियाचा 'द मोस्ट पॉप्युलर' क्रिकेटर विराट कोहली... क्रिकेटचं मैदान गाजवणारा विराट सध्या बॉलिवूड गाजविणाऱ्या अनुष्कावर भलताच फिदा झालाय. 

भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहली सध्या अभिनेत्री अनुष्का शर्मावर अक्षरशः फिदा झालाय. अनुष्का हीच आपल्यासाठी आतापर्यंतची 'द मोस्ट लकी चार्म' असल्याचं भारतीय क्रिकेट टीमचा हा 'लकी चार्म' म्हणतोय. एरव्ही क्रिकेटच्या मैदानात विराटचे चाहते काही कमी नाहीत. मात्र, लाखो तरुणींची 'दिल की धडकन' बनलेल्या विराटला अनुष्का हीच सबसे फेव्हरेट वाटतेय. दोघांचं ट्युनिंगही सध्या एकदम जमून आलेलं दिसतंय.

पार्टी कोणतीही असो विराट आणि अनुष्का एकत्र झळकलेच म्हणून समजा... मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या फिल्मच्या स्पेशल स्क्रीनिंगसाठी आख्खी भारतीय क्रिकेट टीम एकत्र  हजर झाली होती. त्यात नव्हता तो केवळ विराट कोहली... त्यामुळे अर्थातच सगळ्यांना आश्चर्यही वाटलं होतं. मात्र, काही वेळातच विराटने अनुष्कासोबत एन्ट्री केली आणि सर्वांच्या भुवया उंचावल्या. 

आपल्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत जे काही चांगले क्षण आले, ते केवळ आणि केवळ अनुष्कामुळेच असं सांगताना या पठ्ठ्याला अनुष्काचं कौतुक करताना जणू अक्षरशः शब्द कमी पडतात. अनुष्काची तारीफ करताना सध्या तरी विराट अजिबात थकताना दिसत नाहीय. क्रिकेट आणि बॉलिवूडचं नातं तसं भारतीय फॅन्सना नवं नाही. या लव्हबर्ड्सचा सध्याचा एकूणच अंदाज बघता लवकरच हे दोघं रेशीमगाठीत बांधले जातील, अशी अपेक्षा करायला हरकत नाही...