वामिकाला अतिशय घट्ट उराशी धरणारी अनुष्का, पहिला फोटो आला समोर

अनुष्काचा प्रेमळ अंदाज 

Updated: Apr 20, 2021, 01:01 PM IST
वामिकाला अतिशय घट्ट उराशी धरणारी अनुष्का, पहिला फोटो आला समोर

मुंबई : अभिनेत्री, निर्माता अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली हे दोघे नुकतेच मुलगी वामिकासोबत मुंबई एअरपोर्टला दिसले आहेत. सध्या विराट आपल्या इंडियन प्रिमिअर लिग (IPL) मध्ये व्यस्त आहे. विराट कोहली (Virat Kohli) च्या कॅप्टन रॉयल चॅलेंजर्स बंगलौर (Royal Challengers Bangalore) ने आयपीएलच्या 14 व्या सीझनमध्ये आपल्या सुरूवातीच्या तीन मॅच चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडिअममध्ये खेळले. आता काही सामने वानखेडे स्टेडिअमवर खेळले जाणार आहेत. या सामन्याकरता विराट कोहली आपल्या कुटुंबासोबत मुंबईत आला आहे. 

मुंबई एअरपोर्टवर आरसीबीचा कॅप्टन विराट कोहली, त्याची पत्नी अनुष्का शर्मा आणि त्याची मुलगी वामिका स्पॉट केलं आहे. यावेळी अनुष्काने वामिकाला अतिशय घट्ट उराशी धरलं आहे. पण यामध्ये वामिकाचा चेहरा दिसत नाही. अनुष्काचा हा फोटो मानव मंगलानीने कॅप्चर केला आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

अनुष्का शर्माने आता गरोदरपणानंतर कामातून ब्रेक घेतला आहे. तर विराट कोहली आयपीएल 2021 मध्ये टीम आरसीबीचा कॅप्टन आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

मुंबई एअरपोर्टवर विराट कोहली आरसीबीचं टीशर्ट घालून दिसला. तर अनुष्का शर्मा (Anushka Sharma) सफेद शर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स घातलेली दिसते. अनुष्काची मुलगी वामिका (Vamika) ला कुशीत घेतलं आहे.