अनुष्का शर्माचा रणवीरसोबतचा लिपलॉक होतोय व्हायरल, या सिनेमासाठी दिला होता सीन

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचा अभिनय लोकांना फार आवडतो.

Updated: Jan 22, 2022, 12:41 PM IST
अनुष्का शर्माचा रणवीरसोबतचा लिपलॉक होतोय व्हायरल, या सिनेमासाठी दिला होता सीन title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचा अभिनय लोकांना फार आवडतो. अभिनेत्रीने आता क्रिकेटर विराट कोहलीसोबत लग्न केलं आहे आणि त्या दोघांनाही एक गोंडस मुलगी देखील आहे. अनुष्का शर्माने शाहरुख खानच्या 'रब ने बना दी जोडी' या चित्रपटातून आपल्या करियरची सुरूवात केली. ज्यामध्ये ती अत्यंत साध्या भूमिकेत दिसली होती. परंतु अनुष्काने तिच्या दुसऱ्याच चित्रपटात म्हणजे 'बँड बाजा बारात'मध्ये इंटिमेट सीन देऊन सगळ्यांनाच थक्कं केलं आहे.

या चित्रपटात तिने रणवीर सिंगसोबत एक इंटिमेट सीन दिला आहे. ज्यामध्ये तिने लिपलॉक केले होते. ज्याची चर्चा अजूनही होते. त्यावेळेचे दोघांचे फोटो आणि व्हिडीओ आताही सोशल मीडियावरती तुम्हाला पाहायला मिळतात.

रणवीर संग जमकर दिए इंटीमेट सीन

अनुष्का शर्माने रणवीर सिंगसोबत 'बँड बाजा बारात' या चित्रपटात काम केले होते, ज्यामध्ये दोघांची केमिस्ट्री लोकांना खूप आवडली होती. या चित्रपटात अनुष्का शर्माने रणवीर सिंगसोबत खूप बोल्ड सीन्स दिले होते, ज्याची खूप चर्चा झाली होती.

बँड बाजा बारात हा अनुष्काचा दुसरा चित्रपट होता तर रणवीर सिंगने या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केले होते. दोघांसाठी ही इंडस्ट्री नवीन असली तरीही, आपल्या मेहनतीच्या जोरावर दोघांनीही बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलं आहे. हा चित्रपट 2010 मध्ये प्रदर्शित झाला होता, ज्याचे दिग्दर्शन मनीश शर्मा यांनी केले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी देखील ठरला.

तसेच या सिनेमाध्ये अनुष्का आणि रणवीर दोघांनी अप्रतीम डान्स देखील केला. या सिनेमातील गाण्यांनी देखील लोकांच्या मनात जागा निर्माण केली आहे.