अनुष्काने परीमधील भयानक रुप असे साकारले!

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचा परी हा हॉरर सिनेमा २ मार्चला प्रदर्शित झाला. 

Updated: Mar 7, 2018, 10:56 AM IST
अनुष्काने परीमधील भयानक रुप असे साकारले! title=

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचा परी हा हॉरर सिनेमा २ मार्चला प्रदर्शित झाला. यात तिची भूमिका ग्लॅमरस नसून तिचा लूक साधा सिंपल आणि काही वेळेस भयानक दाखवण्यात आला आहे. ही भूमिका साकारणे अनुष्कासाठी सोपे नव्हते.

खास व्हिडिओ

तिच्या या प्रवासातील काही क्षण तिने व्हिडिओद्वारे आपल्यासोबत शेअर केले आहेत. हा व्हिडिओ शेअर करताना तिने लिहिले आहे की, रुखसनाला आयुष्यात आणण्यासाठी खून, पसीना आणि आसू (रक्त, घाम आणि अश्रूंची) गरज भासली.

इतकी केली कमाई

या सिनेमाची कथा बॉलिवूडच्या इतर हॉरर फिल्म्सपेक्षा वेगळी आहे. या सिनेमात अनुष्कासोबत अभिनेता परमब्रता चटोपाध्याय यांची प्रमुख भूमिका आहे. या सिनेमाची निर्मिती स्लेट प्रॉडक्शन आणि क्रिअर्ज यांनी एकत्रितपणे केली आहे. परी हा सिनेमा लोकांच्या चांगलाच पसंतीस पडला. सिनेमाने आतापर्यंत १७ कोटींची कमाई केली आहे. 

सध्या यात आहे व्यस्त

सध्या अनुष्का सुई धागा या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यात ती वरूण धवनसोबत दिसेल. याव्यतिरिक्त शाहरूख खान आणि कतरिना कैफसोबत झीरो या सिनेमातही झळकेल.