ट्रोल झालेल्या फोटोवर पहिल्यांदाच बोलली अनुष्का शर्मा

काय म्हणाली अनुष्का?

ट्रोल झालेल्या फोटोवर पहिल्यांदाच बोलली अनुष्का शर्मा  title=

मुंबई : इंग्लड दौऱ्या दरम्यान नवरा आणि इंडियन क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहलीसोबत पत्नी- अभिनेत्री अनुष्का शर्माचा फोटो सोशल मीडियावर ट्रोल झाला होता. या प्रकरणावर पहिल्यांदाच अनुष्का शर्मा बोलली आहे. अनुष्का शर्मा आपल्या नवऱ्यासोबत काही दिवसांपूर्वी लंडनला होती. पहिल्या टेस्ट मॅचनंतर बीसीसीआयने टीम इंडियाचा एक फोटो शेअर केला आहे. या टीम इंडियाच्या फोटोत अनुष्का शर्मा देखील होती. तिच्या उपस्थितीमुळे सोशल मीडियावर बरीच ट्रोल झाली. 

अनुष्काने दिली यावर सफाई 

अनुष्का या प्रकरणावर म्हणाली की, ज्यांना सफाई द्यायची होती. त्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. ही एक ट्रोलिंग अॅक्टिव्हिटी होती. मी ट्रोलिंगवर आपली प्रतिक्रिया देत नाही. जे काही तिथे झालं ते सगळं नियमांमध्ये होतं. मला नाही वाटतं हा काही मोठा मुद्दा आहे?

या सगळ्या वादावर आता बीसीसीआयनं स्पष्टीकरण दिलं आहे. भारतीय उच्चायुक्तांनी खेळाडू आणि त्यांच्या कुटुंबाला भोजनाचं आमंत्रण दिलं होतं. परदेश दौऱ्यांमध्ये अशाच प्रकारे उच्चायुक्त खेळाडू आणि त्यांच्या कुटुंबाला भोजनाला बोलावतात. यामध्ये कोणताही नियमांचा भंग झालेला नाही. भोजनाला पत्नीला घेऊन जायचं किंवा नाही हा खेळाडूचा वैयक्तिक प्रश्न आहे, असं वक्तव्य बीसीसीआयच्या सूत्रांनी केलं आहे. आमंत्रण गेल्यामुळेच अनुष्का शर्मा या कार्यक्रमाला आली. या सोहळ्याचं आयोजन भारतीय उच्चालयानं नाही तर भारतीय उच्चायुक्त आणि त्यांच्या पत्नीनं केलं होतं. अजिंक्य रहाणेला शेवटच्या रांगेत उभं राहायला कोणीही सांगितलं नव्हतं. तो स्वत:च तिकडे जाऊन उभा राहिला असेल, असं बीसीसीआयनं सांगितलं.

'सुई-धागा' या सिनेमातून पहिल्यांदाच अनुष्का आणि वरूण धवनची जोडी समोर येत आहे. हा सिनेमा 28 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा 'पटाखा' या विशाल भारद्वाजच्या सिनेमासोबत टक्कर देणार आहे.