बाहुबलीच्या अभिनेत्रीची संपत्ती ऐकून तुम्हालाही विश्वास बसणार नाही

बाहुबली चित्रपटातील लोकप्रिय अभिनेत्री अनुष्का शेट्टीचा आज 36 वा वाढदिवस आहे. देवसेनाच्या भूमिकेत लोकांनी तिला खूप पंसती दिली. अनुष्काचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे तिचे अनेक गुपीतं आम्ही तुमच्यासमोर आणणार आहोत. अनुष्काचे खरे नाव काय आहे हे फार थोड्या लोकांना माहित आहे. अनुष्काचे खरे नाव स्विटी शेट्टी आहे. अनुष्काच्या स्मित हस्यावरुन तिचं नाव स्विटी ठेवण्यात आलं होतं.

Updated: Nov 7, 2017, 04:30 PM IST
बाहुबलीच्या अभिनेत्रीची संपत्ती ऐकून तुम्हालाही विश्वास बसणार नाही title=

मुंबई : बाहुबली चित्रपटातील लोकप्रिय अभिनेत्री अनुष्का शेट्टीचा आज 36 वा वाढदिवस आहे. देवसेनाच्या भूमिकेत लोकांनी तिला खूप पंसती दिली. अनुष्काचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे तिचे अनेक गुपीतं आम्ही तुमच्यासमोर आणणार आहोत. अनुष्काचे खरे नाव काय आहे हे फार थोड्या लोकांना माहित आहे. अनुष्काचे खरे नाव स्विटी शेट्टी आहे. अनुष्काच्या स्मित हस्यावरुन तिचं नाव स्विटी ठेवण्यात आलं होतं.

अनुष्का बद्दल आणखी एक गोष्ट प्रसिद्ध आहे. तिच्या ड्रायव्हरच्या कामामुळे प्रसन्न झालेल्या अनुष्काने त्याला 12 लाख रुपयांची नवी कार भेट दिली होती. अनुष्का 22 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच १४० कोटींच्या मालमत्तेची मालक आहे. हैदराबादमधील पॉश भागात ज्युबिली हिल्समध्ये ती राहते. वुड्स अपार्टमेंटच्या सहाव्या मजल्यावर तिचं अलिशान घर आहे. 

सध्या अनुष्का एका चित्रपटासाठी 4-5 कोटी रुपये घेते. लक्झरी कारची चाहती आहे. बाहुबलीची अभिनेत्री अनुष्का शेट्टीकडे बऱ्याचं मोठ्या ब्रँडेड गाड्या आहेत. सध्या तिच्याकडे बीएमडब्लू 6, ऑडी ए 6, ऑडी क्यू 5 आणि टोयोटा कोरोला सारख्या लक्झरी कार आहेत.

2005 मध्ये प्रदर्शित झालेला तेलुगू चित्रपट 'सुपर' मध्ये अनुष्का पहिल्यांदा झळकली. 36 वर्षाच्या अनुष्काने रुद्रम देवी (2015), वेदम (2010), अरुंधती (2009), सिंघम आणि 'बाहुबली' या चित्रपटांमध्ये काम केले आहे.