अपारशक्ती पहिल्यांदाच मुख्य भूमिकेत

'या' अभिनेत्रीसह पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करणार.  

Updated: Dec 14, 2019, 12:49 PM IST
अपारशक्ती पहिल्यांदाच मुख्य भूमिकेत title=

मुंबई : बॉलिवूडचा राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता आयुषमान खुरानाचा थाकटा भाऊ अपारशक्ती खुराना आता चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाला आहे. 'पति पत्नी और वो', 'दंगल' आणि 'स्त्री' या चित्रपटांमध्ये सहायक अभिनेत्याची भूमिका साकारत त्याने चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. आता लवकरच तो मुख्य भूमिकेच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. 

सुत्रांच्या सांगण्यानुसार अभिनेत्री प्रनूतन बहल आणि अपारशक्ती खुराना एकत्र स्क्रिन शेअर आहे. Dino Morea चित्रपटाचे निर्मिती करणार आहेत. परंतु अद्याप चित्रपटाबद्दल कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा केलेली नाही. शिवाय चित्रपटाचं नाव काय असेल याबद्दल देखील खुलासा करण्यात आलेला नाही. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

I dream with these eyes

पण, जर का अपारशक्ती कोणत्या चित्रपटात झळकला तर त्या चित्रपटात तो मुख्य अभिनेता म्हणूनच पदार्पण करेल. अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. आता पर्यंत त्याने अनेक चित्रपटांमध्ये आणि जाहिरांतींमध्ये देखील काम केले आहे. 

त्याच्या अभिनयाचे कौतुक देखील सर्वच स्थरातून होत आहे. आतापर्यंत त्याने 'हॅपी फिर भाग जाएगी', बद्रीनाथ की दुल्हनिया, लुका छुपी, जबरिया जोड़ी या चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेता अक्षय कुमार स्टारर 'बाला' चित्रपटात देखील त्याची झलक चाहत्यांना अनुभवता आली होती. 

तर आगामी चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री प्रनूतन बहल झळकणार आहे. ती मोहनीश बहल यांची मुलगी आहे. प्रनूतनने 'नोटबूक' चित्रपटाच्या माध्यमातून सिनेविश्वात डेब्यू केला होता. तिच्यासोबत अभिनेता झहीर इकबालने देखील सिनेविश्वात डेब्यू केला. चित्रपटातील त्यांची केमेस्ट्री चाहत्यांना चांगलीच भावली होती.