अपुर्वा नेमळेकरचा अभिनयक्षेत्रातला १० वर्षाचा प्रवास, पोस्टमध्ये सांगितलं गुपित

अपुर्वाला अभिनय क्षेत्रात 10 वर्ष पूर्ण झाली आहेत.

Updated: Jun 2, 2021, 03:07 PM IST
अपुर्वा नेमळेकरचा अभिनयक्षेत्रातला १० वर्षाचा प्रवास, पोस्टमध्ये सांगितलं गुपित title=

मुंबई : अभिनेत्री अपुर्वा नेमळेकर म्हणजे सर्वांची लाडकी शेवंता. 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेच्या माध्यमातून अपुर्वाने सर्वांच्या मनात आपलं वर्चस्व प्रस्तापित केलं आहे. अपुर्वाला अभिनय क्षेत्रात 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. या दहा वर्षांमध्ये अपुर्वाने अनेक चांगल्या-वाईट गोष्टींचा सामना केला. पण तिने कधीही मागे वळून पाहिलं नाही. तिने अभिनयाचा प्रवास सुरूचं ठेवला. अनेक वर्ष कला विश्वात काम करणाऱ्या अपुर्वाला 'रात्रीस खेळ चाले' मालिकेच्या माध्यमातून नवी ओळख मिळाली.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Apurva Nemlekar (@apurvanemlekarofficial)

अपुर्वाने हा आनंद सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केला आहे. अपुर्वाने 'आभास हा' मालिकेच्या माध्यमातून आपल्या करियरची सुरूवात केली. तिने काही फोटो शेअर करत कॅप्शनच्या माध्यमातून सर्व जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत तिने चाहत्यांचे  आभार देखील मानले. कॅप्शनमध्ये तिने अभिनयाची सुरूवात कशाप्रकारे झाली हे देखील सांगितलं आहे. 

अपुर्वाने 'आभास हा' या मालिकेतून मी या चंदेरी दुनियेत प्रवेश केला. त्यानंतर 'एकापेक्षा एक' या डान्स शोमध्ये भाग घेतला.'भाखरखाडी 7किमी', 'इश्क वाला लव्ह','व्हीला','द ऍक्सीडेन्टल प्रायं मिनिस्टर','सब कुशल मंगल' यासारख्या हिंदी वं मराठी चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. पण तिला सर्वात जास्त लोकप्रियता 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेच्या माध्यमातून मिळाली.