22 वर्ष लहान गर्लफ्रेंडला डेट करतोय अरबाज खान

पाहा कोण आहे अरबाजची नवी गर्लफ्रेंड

Updated: Oct 29, 2018, 12:46 PM IST
22 वर्ष लहान गर्लफ्रेंडला डेट करतोय अरबाज खान title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अरबाज खान सध्या नव्या लव्हस्टोरीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सध्या अरबाज आपल्यापेक्षा 22 वर्ष लहान गर्लफ्रेंड जियोर्जियाला डेट करतो आहे. सध्या सोशल मीडियावर त्यांचे अनेक फोटो देखील व्हायरल होत आहे. त्यातच आता एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये दोघेही एकत्र दिसत आहे.

हा व्हिडिओ अर्पिता खान शर्माच्या घराजवळचा आहे. काही दिवसांपूर्वी संपूर्ण खान कुटुंबिय अर्पिताचा पती आयुष शर्माच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याच्या घरी पोहोचले होते. जियोर्जिया आणि अरबाज देखील या ठिकाणी होते. हा व्हिडिओ त्या दरम्यानचाच आहे. ज्यामध्ये अरबाज आणि जियोर्जिया एकसोबत अर्पिताच्या घरातून निघताना दिसत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Arbaaz with GF Georgia at aayush Sharma birthday bash @manav.manglani

A post shared by Manav Manglani (@manav.manglani) on

मलाइका अरोडा सोबत घटस्फोट झाल्यानंतर अरबाजच्या आयुष्यात आता जियोर्जिया आली आहे. अरबाज तिच्यासोबत नवीन नातं जोडतो आहे. अरबाज खानसोबत जियोर्जिया अर्पिता खान शर्माच्या घरी ईदच्या पार्टीसाठी देखील पोहोचली होती. त्यानंतर जियोर्जियाने अरबाज खानच्या बर्थडे सेलिब्रेशनचे काही फोटो देखील शेअर केले आहेत. पुढच्या वर्षी म्हणजेच 2019 मध्ये दोघेही विवाह करणार असल्याचं देखील बोललं जात आहे.