कारमध्ये रोमान्स करताना अभिनेत्रीला 'रंगेहाथ' पकडलं तेव्हा....

लिव-इन रिलेशनशिपमध्ये होती अभिनेत्री 

Updated: Nov 11, 2019, 02:10 PM IST
कारमध्ये रोमान्स करताना अभिनेत्रीला 'रंगेहाथ' पकडलं तेव्हा....

मुंबई : 'द कपिल शर्मा' शोमध्ये नवज्योत सिंग सिद्धूच्या जागी अभिनेत्री अर्चना पूरन सिंह आली. अर्चनाने देखील प्रेक्षकांना धरून ठेवलं आहे. चाहते आणि शोमधील कलाकार अर्चनाची उपस्थिती एन्जॉय करतात. अर्चनाने या शोमध्ये एक मोठा खुलासा केला आहे. अर्चनाने तिच्या आणि परमीतच्या अगदी खासगी आयुष्यातील गोष्ट शेअर केली आहे. 

या गोष्टीमुळे अर्चना आणि परमीत सध्या खूप चर्चेत आले आहेत. अर्चनाने सांगितलं की, रात्री खूप उशिरा कारमध्ये रोमान्स करताना तिला आणि तिच्या नवऱ्याला पोलिसांनी पकडलं होतं. अर्चनाने हा किस्सा 'द कपिल शर्मा शो'मध्ये सांगितलं. एका रात्री ती आणि परमीत खूप उशिरापर्यंत कारमध्ये रोमान्स करत होते. तेव्हा पोलिसाने त्यांच्या कारची काच ठोठावली आणि त्यांना पकडलं. 

अर्चना म्हणते की.'तेव्हा मी खूप घाबरले होते.पोलिसांना आम्ही विवाहित असल्याचं देखील सांगितलं'. एवढचं नव्हे तर पुढे अर्चना म्हणते की,'कारमध्ये पावसात रोमान्स करणं आवडतं.'

अर्चनाचं परमीतसोबत दुसरं लग्न आहे. परमीत आणि अर्चना यांची लव्हस्टोरी एका कार्यक्रमातून सुरू झाली होती. पहिलं लग्न तुटल्यानंतर अर्चनाला कोणत्याच बंधनात अडकायचं नव्हतं. याचदरम्यान तिची ओळख परमीतसोबत झाली आणि त्यांच्या ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. बराचकाळ हे दोघं लिव-इन रिलेशनशिपमध्ये होते.त्यानंतर त्यांनी 30 जून 1992 मध्ये लग्न केलं.