Malaika Arora and Arjun Kapoor : सध्या चर्चा ती मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरच्या ब्रेकअपची. मलायका आणि अर्जुन हे अनेकदा एकत्र वेकेशनला जाताना दिसतात. त्यातून त्यांचे एकमेकांसोबतच फोटो हे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसतात. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली असते. त्यावेळी चर्चा असते ती म्हणजे त्यांच्या कोझी आणि स्विट, रोमॅण्टिक फोटोंची. त्यामुळे त्यांचे फोटो हे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसतात. अशावेळी मलायका आणि अर्जुनचे हे फोटो पाहून सर्वसामान्य कपल्सही जेलेस फील करतात. तर अनेकदा त्यांना ट्रोलर्स ट्रोलही करतात. त्यातून सध्या चर्चा ही ती म्हणजे त्यांच्या ब्रेकअपची. यावेळी मात्र अर्जूननंच यावरील खोट्या बातम्यांवर आपल्याच एका कृतीनं खोटं ठरवलं आहे. सध्या त्याच्या या कृतीचीच सर्वत्र चर्चा रंगलेली आहे. तेव्हा चला तर पाहुया असं नेमकं अर्जूननं काय केलंय?
गेल्या दोन दिवसांपासून मलायका आणि अर्जूनच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. काही दिवसांपुर्वी चर्चा होती ती म्हणजे अर्जुन कपूरची. अर्जुननं सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले होते ज्यात तो मलायकाशिवाय कुठेतरी वेकेशनला गेलेला दिसत होता. त्यामुळे त्याची चर्चा सुरू झाली होती. यावेळी मलायका कुठे? त्या दोघांचे ब्रेकअप झाले की काय? अशी सोशल मीडियावर चर्चा रंगायला लागली होती. त्यामुळे अर्जुन कपूर आणि मलायकाला ट्रोलही केलं जात होतं? यावेळी या फोटोमध्ये अर्जुन कपूर हा फारच एकटा आणि शांत वाटत होता. त्यातून त्यानंतर आता फार कमी वेळा अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा दिसत आहेत अशी चर्चा सुरू झाली होती.
काल तिनं Lets Fall Apart अश्या स्लोगनचा टीशर्ट परिधान केला होता. यावेळी ती नेहमीप्रमाणे जीममधून बाहेर आली होती. नेहमीप्रमाणे ती तिच्या ग्लॅमसूटमध्येही दिसली नव्हती. त्यामुळे तिची फार चर्चा रंगली होती. आता समोर आलेल्या माहितीनुसार अर्जुनच्या बहीणीला अनुषाला कपूरला मलायकानं अनफॉलो केलं आहे याची चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे आता त्यांचे खरंच ब्रेकअप झालं आहे का याची जोरदार चर्चा सुरू झाली होती.
परंतु थांबा, आता अशी बातमी समोर येते आहे की त्यांचे ब्रेकअप झालेले नाही. तर यावेळी मलायकाच्या एका पोस्टवर अर्जूननं कमेंट केली आहे. यावेळी मलायकानं आजच्या International Dog Day च्या निमित्तानं एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ''#InternationalDogDay: माझ्यासोबत माझ्या शूटिंगच्यावेळी सोबत तुझ्याशिवाय दुसरं कोणीच नाही. मी प्रत्येक दिवस माझ्या या सुपरस्टारसोबत साजरा करते, Casper''. त्यावर लगेचच खाली अर्जुननं दोन कमेंट्स केल्या आहेत. एक म्हणजे The real star of ur life casper यात त्यानं हार्ट इमोजी टाकल्या आहेत. तर दुसऱ्या कमेंटमध्ये लिहिलंय, Handsome boy आणि पुढे त्यानं काही इमोजी टाकल्या आहेत.
त्यामुळे त्यांच्या ब्रेकअप नाही हेच यावरून सिद्ध होते. त्यावर मलायकानं अजून रिप्लाय पोस्ट केलेला नाहीये.
|
SRH
(20 ov) 216/6
|
VS |
RR
159(19 ov)
|
| Sunrisers Hyderabad beat Rajasthan Royals by 57 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
RCB
(20 ov) 240/4
|
VS |
MI
222/5(20 ov)
|
| Royal Challengers Bengaluru beat Mumbai Indians by 18 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
LSG
(20 ov) 164/8
|
VS |
GT
165/3(18.4 ov)
|
| Gujarat Titans beat Lucknow Super Giants by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.