अर्जुन कपूर आणि मलायका अरोराचा ब्रेकअप? 'या' एका कारणामुळे चर्चांना उधाण

अर्जुन मलायकाच्या ब्रेकअप चर्चां दरम्यान अभिनेत्याचा मोठा निर्णय; जाणून तुम्हालाही बसेल धक्का

Updated: Jul 21, 2022, 04:31 PM IST
अर्जुन कपूर आणि मलायका अरोराचा ब्रेकअप? 'या' एका कारणामुळे चर्चांना उधाण title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री मलायका अरोरा यांची जोडी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. हे दोघं सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. काही दिवसांपूर्वी अर्जुननं मलायका ज्या सोसायटीत राहते त्याच्या जवळच्या सोसायटीत एक फ्लॅट घेतल्याचे म्हटलं जात होतं.  आता त्याने हा फ्लॅट विकल्याचं समोर आलं आहे. यामुळे त्या दोघांचा ब्रेकअप झाल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. 

अर्जुननं घेतलेला हा फ्लॅट बांद्रा परिसरात असलेल्या 81 ऑरेन्ट बिल्डिंगमध्ये होता. या बिल्डिंगमध्ये त्याचा 4BHK फ्लॅट होता आणि हा फ्लॅट त्याने आता विकल्याचे म्हटले जाते. अर्जुनचा हा फ्लॅट मलायकाच्या घरा जवळ होता. त्याने हा फ्लॅट २० कोटी रुपयांमध्ये खरेदी केला होता, पण हाच फ्लॅट त्याने आता १६ कोटी रुपयांना विकला आहे. हा फ्लॅट विकल्याने अर्जुनला ४ कोटींचं नुकसान झालं आहे. 

अर्जुनचा हा 4BHK फ्लॅट 4364 स्क्वेअर फीटचा आहे. पण अर्जुन आणि मलायकाचा ब्रेकअप झाला नसून या फक्त चर्चा आहेत. अर्जुन सध्या जुहूमध्ये असलेल्या रहेजा ऑर्चिड बिल्डिंगमध्ये राहतो. या व्यतिरिक्त या बिल्डिंगमध्ये अनेक सेलिब्रिटी राहतात. 

अर्जुनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, त्याचा अॅक्शन-थ्रिलर चित्रपट 'एक व्हिलन रिटर्न्स' लवकरच प्रदर्शित होणार आहे आणि सध्या तो या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात त्याच्याशिवाय जॉन अब्राहम, दिशा पटानी आणि तारा सुतारिया देखील दिसणार आहेत. याशिवाय तो 'कुत्ते' या चित्रपटातही दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत राधिका मदान, तब्बू आणि नसीरुद्दीन शाह यांच्याही भूमिका आहेत. पुढे, अर्जुन आसमान  भारद्वाजच्या अनटोल्ड आणि अजय बहलच्या 'द लेडी किलर'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात भूमी पेडणेकर दिसणार आहे.