'मी त्यावेळी तुझ्या आसपास नसेन...' अर्जुन कपूरने त्याच्या लेडी लव्हसाठी शेअर केली पोस्ट

अर्जुन कपूर 'या' खास क्षणाला नसणार मलायकासोबत... पाहिलीत का Post?  

Updated: Nov 18, 2022, 11:32 PM IST
'मी त्यावेळी तुझ्या आसपास नसेन...' अर्जुन कपूरने त्याच्या लेडी लव्हसाठी शेअर केली पोस्ट  title=
arjun kapoor romantic post on malaika arora news chat show moving in with malaika photo viral nz

Arjun Kapoor Post on Malaika Arora: मलायका अरोरा अशा स्टार्सपैकी एक आहे जी ट्रोलिंगकडे लक्ष न देता फक्त तिला पाहिजे ते करते. तिच्या लव्ह लाईफबद्दल बोलायचं, ड्रेसिंग किंवा आणखी काही, मलायका कशातच लक्ष देत नाही. तुम्ही मलायका अरोराला रिअॅलिटी शोमध्ये जज म्हणून अनेकदा पाहिले असेल.  मलायका आता तिचा एक नवीन शो घेऊन येत आहे, ज्याबद्दल ती चर्चेत आहे. विशेष म्हणजे मलायकाही या शोमध्ये ट्रोलला (Troller) उत्तर देताना दिसणार आहे. मलायका तिच्याच चॅट शोमध्ये (Chat show) पहिल्यांदाच दिसणार आहे. ज्याचे नाव आहे 'मूव्हिंग इन विथ मलायका' (Moving in with Malaika). हा शो 5 डिसेंबरपासून प्रसारित होणार आहे. हा शो सुरू होण्यापूर्वी अर्जुन कपूरने आपल्या लेडी लव्हसाठी इतकी प्रेमळ पोस्ट (Post) लिहिली आहे की ती काही क्षणातच व्हायरल होत आहे. (arjun kapoor romantic post on malaika arora news chat show moving in with malaika photo viral nz)

अर्जुन कपूरने सेल्फी (Selfie) घेतला

अर्जुन कपूरने मुंबईतील ताज हॉटेलजवळचा (Taaj Hotel) एक सेल्फी सोशल मीडियावर (Social Media) शेअर केला आहे. या फोटोत अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि मलायका अरोरा खूप आनंदी दिसत आहेत. या फोटोमध्ये मलायकाने काळ्या टोपीसह पांढरा शर्ट घातला आहे. तर अर्जुन कपूर निळ्या रंगाचा प्रिंटेड शर्ट परिधान केलेला दिसत होता. अर्जुन आणि मलायका त्यांचा लूक (Look) मॅचिंग करण्यासाठी काळ्या रंगाचा गॉगल परिधान करताना दिसले.

हे ही वाचा - Ira Khan Engagement: आमिर खानच्या लेकीने गुपचूप उरकली एंगेजमेंट, Video आला समोर

सेल्फी शेअर 'बेबीज डे आऊट...

हा सेल्फी शेअर करताना अर्जुन कपूरने कॅप्शनमध्ये (Caption) लिहिले- 'बेबीज डे आऊट... बेबीचा शो लवकरच सुरू होणार आहे आणि माझा आऊटडोअरही लवकरच सुरू होणार आहे. मला माहित आहे की मी त्यावेळी तुझ्या आसपास नसेन पण मला माहित आहे की तुझ्या या नवीन प्रवासात तू खूप छान काम करशील. अर्जुन कपूरने त्या कॅप्शनच्या माध्यमातून स्वत:चे प्रेम जाहीर केले आणि तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा देखील दिल्या. 

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सेलिब्रिटी कमेंट 

अर्जुन कपूरने हा फोटो सोशल मीडियावर शेअर करताच चाहत्यांनी फोटोवर कमेंट (Comment) करायला सुरुवात केली. महीप कपूरने कमेंटमध्ये हार्ट आयकॉन शेअर केला आहे. यासोबतच चाहत्यांनी एकापाठोपाठ एक कमेंट करायला सुरुवात केली. अर्जुन कपूर मलायका अरोराला बऱ्याच दिवसांपासून डेट (Date) करत आहे. हे दोघेही रोज एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो (Romantic Photo) शेअर करत असतात. दोघांचे रोमँटिक फोटो आणि व्हेकेशनचे फोटोही (Vacation photos) त्यांच्या चाहत्यांना आवडतात.