अर्जुन कपूरचा मेसेज पाहून लाजली मलायका; काय होत त्या मेसेजमध्ये?

 अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा सिनेसृष्टीतील अतिशय लोकप्रिय जोडी आहे.  

Updated: Sep 23, 2021, 08:56 AM IST
अर्जुन कपूरचा मेसेज पाहून लाजली मलायका; काय होत त्या मेसेजमध्ये?

मुंबई : अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा सिनेसृष्टीतील अतिशय लोकप्रिय जोडी आहे. दोघं एकमेकांना बऱ्याच दिवसांपासून डेट करत आहेत. अनेकदा दोघं सार्वजनिक ठिकाणी मोकळेपणाने फिरताना दिसतात. या दोघांची चर्चा वेगवेगळ्या कारणाने होताना दिसते. एवढंच नाही तर व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत दोघं त्यांच्या नात्याला वेळ देतात. कधी एकत्र फिरायला जातात, तर कधी मेसेज  करत एकमेकांची काळजी घेतात. मलायका सध्या सुपरमॉडेल ऑफ द ईयर शोमध्ये व्यस्त आहे.

शोमध्ये मलायकासोबत मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमन परीक्षकाची भूमिका पार पाडत आहेत. यावेळी मलायका आणि मिलिंदमध्ये  क्रश, टर्न-ऑन आणि टर्न-ऑफ या मुद्द्यावर चर्चा सुरू होती. एवढ्यात मलायकाला एक मेसेज येतो आणि ती हासते. तेव्हा मिलिंद, मलायकाला एक प्रश्न विचारतो, असा एक व्यक्ती सांग जो तुला तुझ्या मनापासून ओळखतो? 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मिलिंदच्या या प्रश्नावर मलायका उत्तर देत अभिनेता अर्जुन कपूरचं नाव घेतो. मलायका म्हणते, 'तो मला ओळखतो... तो मला समजून घेतो... तो मला त्रास देखील देतो... ' त्यानंतर ती अर्जुनचा आलेला मेसेज वाचते, त्यामध्ये 'आय लव्ह यू...' पाहून मलायका लाजते...

मॉडेल आणि अभिनेत्री मलायका अरोरा ही सध्याच्या घडीला चर्चेत आहे ते म्हणजे अभिनेता अर्जुन कपूर याच्यासोबतच्या तिच्या नात्यामुळे. 43 वर्षीय मलायका तिच्याहून वयाने जवळपास 9 वर्षे लहान असणाऱ्या अर्जुनसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. त्यांच्या या नात्याविषयी माहिती मिळताच चाहत्यांना धक्का बसला होता.