एवढी सुंदर होती ही अभिनेत्री की, बायका त्यांच्या नवऱ्यांना लपवून ठेवायच्या...

बरं झालं, या अभिनेत्रीला पाहून बायकांनी नवऱ्यांना ''घुंघट'' घ्यायला लावला नाही, कोण होती एवढी ही सुंदर अभिनेत्री...?  

Updated: Dec 5, 2021, 01:29 PM IST
एवढी सुंदर होती ही अभिनेत्री की, बायका त्यांच्या नवऱ्यांना लपवून ठेवायच्या...

मुंबई : प्रसिद्ध आणि दिग्गज अभिनेत्री बिंदू सध्या रूपेरी पडद्यापासून दूर आहेत. बिंदू यांनी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण करत त्यांनी मने जिंकली. बिंदू यांनी अनेक सिनेमांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली. विरोधी भूमिकेमुळे त्यांना अनेकदा टीकेचासामना देखील करावा लागला. दुसरीकडे बिंदू त्यांच्या सौंदर्यामुळे खूप चर्चेत आहेत. 

एक काळ असा होता की बिंदू ज्याठिकणी जायच्या तेव्हा बायका त्यांना घाबरून स्वतःनवऱ्यांना लपवायच्या. बिंदू यांनी इंग्रजी वेबसाइटला मुलाखत दिलेल्या मुलाखतीत अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. एवढंच नाही तर त्यांनी त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल देखील अनेक गोष्टी सांगितल्या. 

अभिनेत्रीने सांगितलं, 'जेव्हा पुरुष चाहते मला भेटायला यायचे, तेव्हा त्यांच्या बायका त्यांना मागे खेचायच्या. त्यांना भीती वाटत होती की मी त्यांच्या नवऱ्यांना माझ्या जाळ्यात अडकवेल. पण आता लोकांना रियल आणि रील लाईफ समजलं आहे. पण माझ्यामुळे कोणी दुखावले असेल तर मी लोकांची माफी मागते.''

याशिवाय बिंदू यांनी त्यांच्या फॅन फॉलोइंगबद्दलही सांगितले. ते म्हणाल्या, 'माझे खूप चाहते होते. एक चाहता मला रक्ताने पत्र लिहायचा. मला अशी पत्रे उघडायची भीती वाटत होती. गंमत म्हणजे त्याने पत्रात त्याचं रक्तगटही नमूद केलं. त्याच्या रक्तगटाशी माझा काय संबंध? एवढंच नाहीतर एकाने बिंदू यांना लग्नाची मागणी देखील घातली होती.