गर्दीत अर्जून कपूरने मलाइकाला असं सावरलं, VIDEO व्हायरल

मलाइकाकरता अर्जुन पुन्हा ठरला खास 

Updated: Nov 5, 2021, 12:02 PM IST
गर्दीत अर्जून कपूरने मलाइकाला असं सावरलं, VIDEO व्हायरल  title=

मुंबई : गुरूवारी जगभरात दिवाळीचा उत्साह पाहायला मिळाला. बॉलिवूडमध्ये देखील दिवाळीचा वेगळाच उत्साह होता. अनेक कलाकारांनी आपल्या घरी दिवाळी पार्टीच आयोजन केलं होतं. ज्यामध्ये अनेक कलाकारांची उपस्थिती होती. अशावेळी अभिनेता अनिल कपूर आणि पत्नी सुनीता यांच्याघरी दिवाळीच्या पार्टीचं आयोजन केलं होतं. अनिलच्या घरी सगळे कलाकार जमले होते. यावेळी अर्जुन कपूर आणि गर्लफ्रेंड मलाइका अरोरा हे देखील उपस्थित होते. यावेळी अर्जून मलाइकाची विशेष काळजी करत होता. अर्जुनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांचा व्हायरल व्हिडिओ बॉलिवूडचे प्रसिद्ध फोटोग्राफर विरल भयानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मलायका पिंक कलरच्या साडीमध्ये खूपच हॉट दिसत आहे. त्याचवेळी अर्जुनने काळ्या रंगाचा कुर्ता घातला होता. यादरम्यान अर्जुन मीडियाच्या गर्दीतून मलाइकाला सांभाळताना दिसला. तो मलायकाचा हात पकडून तिला सांभाळताना दिसत आहे.

अनिल कपूरच्या या दिवाळी पार्टीत अर्जुन, मलायका व्यतिरिक्त बोनी कपूर त्यांच्या दोन मुली जान्हवी कपूर आणि खुशी कपूरसोबत पोहोचले होते. यावेळी जान्हवी हिरव्या रंगाच्या साडीत तर खुशी गुलाबी रंगाच्या लेहेंग्यात दिसली. दोन्ही बहिणी सौंदर्याच्या बाबतीत एकमेकांशी स्पर्धा करताना दिसल्या.

त्याचवेळी अर्जुन, मलायका यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अर्जुन, मलायकाचा हा व्हिडिओ पाहून अनेक यूजर्स त्यांना एकत्र पसंत करत आहेत. तर  अनेक जण त्याला ट्रोल करत आहेत.