अनुष्का शर्मावर होतं अर्जुन कपूरचं प्रेम! करण जोहरनं खुलासा करताच कतरिनाला धक्का; अनुष्का म्हणाली, 'पागल'

Arjun Kapoor Was in Love With Anushka Sharma : अनुष्का शर्मावर होतं अर्जुन कपूरचं प्रेम! अनुष्कानं सोशल मीडियावर 

दिक्षा पाटील | Updated: Oct 4, 2024, 01:26 PM IST
अनुष्का शर्मावर होतं अर्जुन कपूरचं प्रेम! करण जोहरनं खुलासा करताच कतरिनाला धक्का; अनुष्का म्हणाली, 'पागल' title=
(Photo Credit : Social Media)

Arjun Kapoor Was in Love With Anushka Sharma : बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये अनुष्का शर्माचं नाव घेण्यात येतं. इतकंच नाही तर तिचं तिच्या सह-कलाकारांशी खूप चांगलं नातं असतं असं नेहमीच बोललं जातं. मात्र, तुम्हाला माहित आहे का की करण जोहरनं एकदा दावा केला होता की अर्जुन कपूर तिच्यावर प्रेम करायचा? त्याविषयी करणनं त्याच्या शोमध्ये खुलासा केला होता आणि अनुष्का आणि कतरिना कैफ या दोघांना आश्चर्य झालं होतं. 

खरंतर 'कॉफी विद करण सीझन 8' मध्ये करणनं जेव्हा या गोष्टीचा खुलासा केला तेव्हा अनुष्का आणि कतरिना कैफ या दोघांना आश्चर्य झालं. त्या एपिसोडमध्ये करण जोहरनं अनुष्काला सांगितलं होतं की 'तुला ही गोष्ट माहित असणं गरजेचं आहे की त्याचं तुझ्यावर प्रेम आहे. तुला हे माहित आहे ना?' हा खुलासा ऐकताच अनुष्का आणि कतरिना या दोघांना धक्का बसला. तर कतरिनानं सांगितलं की 'मला हे माहित नव्हतं.' अनुष्का यावर प्रतिक्रिया देत म्हणाली, 'तू पागल झाला आहेस का?' अनुष्का मस्करी करत करणवर ओरडली की 'तुम्ही मुर्ख झालात का आणि तू तुझ्या शोवर काहीही बोलतेस.'

दरम्यान, करणच्या या शोविषयी बोलायचं झालं तर तो त्याच्याशोमध्ये अनेक वादग्रस्त विधान करण्यासाठी ओळखला जातो. त्यानं सांगितलं होतं की 'अर्जुननं सगळ्यांसमोर त्याला अनुष्कासाठी असलेल्या भावनांविषयी सांगितलं होतं. त्यानं सांगितलं की त्याचं अनुष्का शर्मावर प्रेम आहे आणि अर्जुननं हे अनेदा सांगितलं आहे.' अनुष्का करणला सांगताना दिसते की 'हे नॅशनल टेलिव्हिजनवर दाखवू नका.' तिनं सांगितलं की 'तिला अर्जुनच्या भावनांविषयी काही माहित नाही.' तर कतरिनानं अनुष्काला विचारलं की 'तुला तुझ्या आणि अर्जुनविषयी काही गुपित सांगायचं आहे?' त्यावर अनुष्का म्हणाली, 'मुळीच नाही.'

हेही वाचा : पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट; अभिनेता तातडीनं दुसऱ्यांदा विवाहबंधनात, VIRAL PHOTO मुळे चाहतेही हैराण

खासगी आयुष्याविषयी बोलायचं झालं तर अनुष्कानं विराट कोहलीशी लग्न केलं असून त्यांना दोन मुलं आहेत. लवकरच अनुष्का ही क्रिकेटपटू झूलन गोस्वामीवर आधारीत बायोपिक 'चकदा एक्सप्रेस' मध्ये दिसणार आहे. दुसरीकडे अर्जुन कपूर हा लवकरच रोहित शेट्टी 'सिंघम अगेन' मध्ये दिसणार आहे. अजय देवगण, करीना कपूर, अक्षय कुमार, रणवीर सिंग आणि अनेक कलाकार दिसणार आहेत. तर हा चित्रपट दिवाळीत प्रदर्शित होणार आहे.