close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

बहुचर्चित 'अर्जुन पटियाला'चा ट्रेलर प्रदर्शित

पाहा 'अर्जुन पटियाला' ट्रेलर

Updated: Jun 20, 2019, 02:40 PM IST
 बहुचर्चित 'अर्जुन पटियाला'चा ट्रेलर प्रदर्शित

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन आणि पंजाबी सिंगर दिलजीत दोसांझ यांचा आगामी बहुचर्चित चित्रपट 'अर्जुन पटियाला'चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटातून क्रिती सेनन आणि दिलजीत दोसांझ प्रेक्षेकांचं जबरदस्त मनोरंजन करताना दिसत आहेत. 'अर्जुन पटियाला' या चित्रपटात कॉमेडीचा जबरदस्त तडकाही पाहायला मिळत आहे. 

'अर्जुन पटियाला'चा २ मिनिटं २७ सेकंदाचा ट्रेलर आहे. चित्रपटात क्रिती सेनन आणि दिलजीत दोसांझसह 'फुकरे' फेम वरुण शर्माही आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच अनेकांची चांगली पसंती मिळत असून ट्रेलर व्हायरलही होत आहे. 

काही दिवसांपूर्वी 'अर्जुन पटियाला'चं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं होतं. या पोस्टरवरही क्रिती, वरुण आणि दिलजीत या तिघांचेही कॉमेडी फोटो दिसत होते. चित्रपटात क्रिती 'ऋतू' नावाच्या पत्रकाराच्या भूमिकेत दिसतेय. तर दिलजीत पोलिसाच्या भूमिकेत असून तो फिटनेस फ्रिक 'अर्जुन' हे पात्र साकारणार आहे. वरुण शर्मा 'ओनिडा' ही व्यक्तिरेखा साकारत आहे.

या कॉमेडी चित्रपटात अनेक व्हिलनही दाखवण्यात आले आहेत. त्यामुळे हा चित्रपट कॉमेडी, ड्रामा, रोमॅंटिक, अॅक्शन ड्रामाही आहे. रोहित जुगराज दिग्दर्शित 'अर्जुन पटियाला' येत्या २६ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.