भाची आयतसोबत सलमान मामूचा खास व्हिडिओ

सोशल मीडियावर व्हिडिओ प्रचंड व्हायरल 

Updated: Mar 12, 2020, 02:33 PM IST
भाची आयतसोबत सलमान मामूचा खास व्हिडिओ  title=

मुंबई : बॉलिवूडचा दबंग खान म्हणजे सलमान खानला लहान मुलांची किती ओढ आहे हे आपण अनेकदा पाहिलं आहे. नुकतीच सलमानच्या घरी एक नन्ही परी आली आहे. सलमानच्या बहिणीला अर्पिता खान शर्माला 'आयत' ही गोड मुलगी झाली आहे. आयतसोबत सलमान खूप चांगला वेळ घालवत असल्याचा व्हिडिओ अर्पिताने शेअर केला आहे. 

अर्पिताच्या या व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. आयतसोबत सलमान खान खेळत आहे. अवघ्या काही महिन्यांची आयत सलमानच लक्ष वेधत आहे. आयत देखील आपल्या मामूसोबत खेळताना दिसत आहे. आयतला एका महिलेने घेतलं आहे आणि सलमान तिच्यासमोर उभा आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

We love you Mamu @beingsalmankhan

A post shared by Arpita Khan Sharma (@arpitakhansharma) on

सलमान सतत आयतला प्रेम करत आहे. तो तिच्या गालावर किस करतो तिच्या ओढांना किस करतो. आणि चिमुकली आयत पुन्हा एकदा आपल्या मामाला मिस करत आहे. सलमान मामू या व्हिडिओत आयतला प्रचंड प्रेम करत आहे. 

हा व्हिडिओ अर्पिताने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली आहे. यामध्ये तिने आयतकडून मामूला मॅसेज लिहिला आहे. 'आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो, मामू...' असा मॅसेज लिहिला आहे. या व्हिडिओवर फक्त चाहतेच नाही तर दिया मिर्झा, पुल्कित सम्राट, मिनी माथुर, एली अवराम सारखे अनेक कलाकार कमेंट करत आहेत.