मुंबई : मुंबईतील क्रूझ शिपवरुन उघड झालेल्या ड्रग्ज प्रकरणातील माहिती वाऱ्याच्या वेगानं पसरु लागली आहे. एनसीबीनं धाड टाक एक मोठं प्रकरण समोर आणलं. यामध्ये अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा, आर्यन खान याला एनसीबीनं ताब्यात घेतलं. त्याच्यासोबतच इतरही काहीजणांना एनसीबीनं ताब्यात घेतलं. ज्यानंतर आता या प्रकरणातील आणखी एक मोठी माहिती समोर आली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार या लग्जरी क्रूजशी जोडल्या गेलेल्या इवेंट मॅनेजमेंट कंपनी ‘Namascray’ च्या सहसंस्थापकांना अटक ताब्यात घेण्यात आलं आहे. एनसीबीनं केलेल्या दाव्यानुसार श्रेयस नायर अटकेशी याचा संबंध जोडला जात आहे. असं म्हटलं जात आहे की, श्रेयस नायरनं 25 पॅसेंजर्सना ड्रग्ज सप्लाय केलं होतं. हे ड्रग्ज क्रिप्टोकरंसीच्या माध्यमातून आणले गेल्याचं म्हटलं जात आहे.
आयोजकांवर गंभीर आरोप
एनसीबीनं NCB क्रूजच्या CEO ना दुसऱ्यांना समन्स बजावलं असून, आता त्यांच्याकडून सीसीटीव्ही डिटेल्स आणि पँसेंजर्सच्या माहितीच्या आधारे प्रश्न करण्यात येतील. मुंबई पोलिसांनीही क्रूजवर रेव्ह पार्टीसाठी अधिकृत परवानगी न घेण्याप्रकरणी जहाजाच्या अधिकाऱ्यांविरोधात तपास सुरु केला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार आयोजकांवर कोविड नियमांचं पालन न करणं, एंटरटेन्मेंट टॅक्स न भरणं आणि अरबी समुद्रातील वादळाच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करणं असे आरोप करण्यात आले आहेत. दरम्यान, सध्या सदर प्रकरणी एनसीबीनं 12 जणांना ताब्यात घेल्याचं म्हटलं जात आहे. तेव्हा आता या प्रकरणाला पुढे काय वळण मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.