Drugs Live Chat : ... सोय होईल का? आर्यनचा अनन्या पांडेला प्रश्न, चॅटमधून धक्कादायक खुलासा

अनन्या पांडेसोबत आणखी दोन स्टार किड्सच्या नावाचा उल्लेख - सूत्र

Updated: Oct 22, 2021, 12:04 PM IST
Drugs Live Chat : ... सोय होईल का? आर्यनचा अनन्या पांडेला प्रश्न, चॅटमधून धक्कादायक खुलासा

मुंबई : ज्या चॅट्सची माहिती देत NCB ने अनन्या पांडेला चौकशी करता बोलावलं. त्यामधून अतिशय धक्कादायक खुलासा समोर आला आहे. चॅटमध्ये आर्यन खान आणि अनन्या पांडे गांजाबद्दल बोलताना दिसत आहे. हे संभाषण या दोघांमध्येच झालं आहे. त्यामुळे आता अनन्या पांडेच्या संकटात वाढ होणार असल्याचं म्हटं जात आहे. 

आर्यन खान, अनन्या पांडेला विचारतोय, (If Ganja can be arrange)गांजा मिळेल का? यावर अनन्याच उत्तर होतं, (She will arrange) ती व्यवस्था करेल..या चॅटमधून धक्कादायक खुलासा झाला आहे. यामुळे अनन्या पांडे यामध्ये अडकणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी जेव्हा अनन्या पांडेला या संदर्भात प्रश्न विचारण्यात आला तेव्हा अनन्या म्हणाली की ती आर्यन खानसोबत विनोद करत होती. NCB च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्यतिरिक्त, त्यांच्या अशा अनेक गप्पा आहेत ज्यात दोघे वेगवेगळ्या प्रसंगी मादक पदार्थांबद्दल बोलत आहेत.

असे सांगितले जात आहे की आर्यन-अनन्याच्या या गप्पांमध्ये नशेबद्दल संभाषण होते. या चॅटनंतर एनसीबी ऍक्शनमध्ये आले आहे. या प्रकरणातील चॅट सुनावणी दरम्यान न्यायालयाला देण्यात आली. गुरुवारी अनन्या पांडे एनसीबी कार्यालयात पोहोचली. त्यावेळी तिच्यासोबत वडील चंकी पांडे होते. 

आर्यन - अनन्याच्या चॅटनुसार, अनन्या पांडेनेच आर्यन खानला ड्रग्स पुरवले आहेत का? याचा तपास NCB खरत आहे. अद्याप NCB कडे या चॅट व्यतिरिक्त ठोस असा पुरावा लागील. याचा तपास NCB करत आहेत. या प्रकरणात अनन्या पांडेसह आणखी दोन स्टार किड्सचा समावेश असल्याचं देखील सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.