Aryan Khan Durg Case : शाहरूखच्या बाजूने उभे राहिले 'हे' 9 कलाकार

संपूर्ण प्रकरणावर शाहरूख खान शांत का? 

Updated: Oct 5, 2021, 08:34 AM IST
Aryan Khan Durg Case : शाहरूखच्या बाजूने उभे राहिले 'हे' 9 कलाकार  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबीने ड्रग्स प्रकरणात अटक केली आहे. आर्यन खानला एनसीबीने मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या जहाजावरून ताब्यात घेतले आणि नंतर चौकशीनंतर अटक केली. सध्या न्यायालयात आर्यन खानचा खटला सुरू आहे. जेव्हापासून आर्यन खानवर न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. तेव्हापासून शाहरुख खानवर सतत टीका होत आहे. मात्र, या परिस्थितीतही शाहरुख खानच्या बाजूने उभे राहिलेले काही लोक आहेत. या लोकांनी आर्यन खानच्या ड्रग प्रकरणावर शाहरुख खानला पाठिंबा दिला आहे. 

सलमान खान 

बॉलिवूड अभिनेता सलमान खान रविवारी रात्री त्याचा मित्र शाहरुख खानच्या घरी पोहोचला. सलमान खानने आर्यन खानला लहानपणापासून पाहिलं आहे. अगदी मांडीवर बसवून भरवले आहे, ज्यामुळे तो स्वतःला थांबवू शकला नाही आणि शाहरुख-गौरीचे दुःख शेअर करण्यासाठी पोहोचला.

अलवीरा खान 

आर्यन खानच्या अटकेनंतर सलमान खानची बहीण अलविरा खानही शाहरुखच्या घरी पोहोचली. मन्नतच्या बाहेर दिसलेल्या अलविराचा व्हिडिओ सध्या चर्चेत आहे.

पूजा भट्ट 

अभिनेत्री पूजा भट्टनेही ट्विट करून शाहरुख खानला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. पूजाने ट्विटमध्ये लिहिले आहे की, कोणीही तिच्याकडे मदत मागितली नाही. पण ती तरी देखील शाहरुख खानच्या पाठीशी उभी आहे.

सुनील शेट्टी 

कलाकार सुनील शेट्टी आदल्या दिवशी एका कार्यक्रमात पोहोचले होते, जिथे त्यांना आर्यन खान ड्रग प्रकरणावर प्रश्न विचारण्यात आला होता. सुनील शेट्टीने माध्यमांना सांगितले की अधिकृत अहवाल बाहेर येऊ द्या आणि त्या मुलाला श्वास घेण्यास वेळ द्या.

हंसल मेहता

दिग्दर्शक हंसल मेहता यांनीही आर्यन खानच्या बाजूने ट्विट करून हे स्पष्ट केले आहे की, तो शाहरुख खानसोबत उभा आहे.

सीमा खान 

काही काळापूर्वीच कलाकार सोहेल खानची पत्नी सीमा खान शाहरुख खानच्या घरी पोहोचली. सीमा खान आणि गौरी खान खूप चांगल्या मैत्रिणी आहेत.

महीप कपूर 

अभिनेता संजय कपूरची पत्नी महीप कपूरही सीमा खानसोबत गौरीला भेटायला आली आहे. संजय कपूर आणि शाहरुख खान खूप चांगले मित्र आहेत. महेप कपूरची मुलगी शनाया आणि आर्यन सुद्धा खूप चांगले मित्र आहेत.

सयानी गुप्ता 

बॉलिवूड अभिनेत्री सायनी गुप्ता हिनेही शाहरुख खानला ट्विट करून पाठिंबा दिला आहे. सायनीने ट्विटमध्ये लिहिले आहे की, तिला आता कळले आहे की शाहरुख खान कोणत्याही विषयावर का बोलत नाही. तो एवढा मोठा स्टार का आहे? हे आता कळलं

शशी कपूर

काँग्रेस नेते शशी थरूर यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून शाहरुख खानची बाजू घेतली आहे. शशी थरूर यांनी लिहिले आहे की या प्रकरणावर सामान्य अहवाल असावा.