मुंबई : अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सध्या ड्रग्स केस प्रकरणी मोठ्या अडचणीत सापडला आहे. ड्रग्स प्रकरणाची जबाबदारी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या खांद्यावर आहे. एका टिपच्या आधारे वानखेडे यांनी 2 ऑक्टोबर रोजी मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर छापा टाकला होता, ज्यामध्ये आर्यनसह 8 जणांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली होती. आर्यन सध्या मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये आहे, त्यामुळे सर्वांच्या नजरा आजच्या सुनावणीवर आणि समीर वानखेडे यांच्यावर आहेत.
या प्रकरणाबाबत NCB अधिकारी गेल्या काही दिवसांपासून खूप दबावाखाली आहेत. गेल्या काही दिवसांपासून एनसीबीवर सर्व प्रकारचे आरोपही लावले जात आहेत. या आरोपांच्या दरम्यान, आता समीर वानखेडे यांच्या पत्नीने प्रतिक्रिया दिली आहे. समीर वानखेडे यांची पत्नी म्हणजे अभिनेत्री क्रांती रेडकरने सत्य उघड केलं आहे.
क्रांती म्हणाली, 'समीर दबाव हाताळण्यात खूप चांगले आहेत. ते ऐतिहासिक लीडर्सशी जोडलेले आहेत. ते जगातील विविध लीडर्सबद्दल वाचून मोठे झाले आहेत. लोक समीर यांना खऱ्या आयुष्यातील सिंघम म्हणतात. समीर यांचे वडील एक निवृत्त पोलीस अधिकारी आहेत. कोणताही मोठा निर्णय घेण्याआधी ते त्यांच्या वडिलांचा सल्ला घेतात...'
दरम्यान, दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडचं ड्रग्स कनेक्शन समोर आलं आहे. जेव्हा बॉलिवूड ड्रग्स प्रकरण समोर आलं तेव्हा अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटी वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. त्यामुळे सर्वांच्या नजरा आजच्या सुनावणीवर आणि समीर वानखेडे यांच्यावर आहेत.