मुंबई : कॉर्डेलिया क्रूज ड्रग्स प्रकरणाशी संबंधित एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ड्रग्स कशाप्रकारे लपवण्यात आली होती हे समोर आलं आहे. मोठी युक्ती लढवत अनेकांनी कोणालाही संशय येणार नाही अशाप्रकारे औषधे लपवली होती. मुंबईतील कॉर्डेलिया क्रूझवर आयोजित ड्रग्स पार्टीमधून अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक आरोपी मुनमुन धमेचाकडून औषधांच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या.
ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानबरोबर अटक झालेल्या मुनमुन धमेचा हिच्या पर्समध्ये असलेल्या सॅनेटरी पॅडमध्ये ड्रग्ज सापडल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. NCBचे अधिकारी या सॅनेटरी पॅडमध्ये दडवून ठेवलेली गोळी बाहेर काढताना या व्हिडिओत दिसत आहेत. रेव्ह पार्टीमध्ये कशाकशात दडवून अमली पदार्थ नेले जातात, हेच या व्हिडिओतून दिसतंय..
ती औषधे मुनमुनने सॅनिटरी पॅडमध्ये लपवली होती. क्रूझमध्ये एनसीबीच्या शोध मोहिमेदरम्यान, मुनमुनच्या खोलीत जप्ती कारवाईचा व्हिडिओ समोर आला आहे. मुंबईच्या एस्प्लेनेड कोर्टाने शुक्रवारी अरबाज सेठ मर्चंट, मुनमुन धमेचा आणि अन्य आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला. या प्रकरणी चिनेडू इग्वे या नायजेरियन व्यक्तीसह एकूण 18 जणांना अटक करण्यात आली आहे.
इग्वे याला न्यायालयाने 11 ऑक्टोबरपर्यंत एनसीबीच्या कोठडीत पाठवले आहे. एनसीबीच्या मते, नायजेरियन नागरिकाला 40 एक्स्टेसी बुलेटसह अटक करण्यात आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुनमुनच्या नावाने क्रूझवर रुम बुक केलेला नव्हता. तिला आयोजकांनी पाहुणी म्हणून पार्टीसाठी आमंत्रित केले होते. एनसीबीच्या टीमने गेल्या शनिवारी गोव्याला जाणाऱ्या कॉर्डेलिया क्रूझवर छापा टाकला आणि क्रूजमधून औषधे जप्त केल्याचा दावा केला. या प्रकरणात आतापर्यंत एकूण 19 लोकांना अटक करण्यात आली आहे.