कारावास, चौकशीचा फेरा संपला; आर्यन खान मार्गी लागला

 शाहरुख खानची मुलं सुहाना खान आणि आर्यन खानच्या डेब्यूची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. 

Updated: Apr 11, 2022, 05:14 PM IST
कारावास, चौकशीचा फेरा संपला; आर्यन खान मार्गी लागला title=

मुंबई : किंग खान शाहरुख खानची मुलं सुहाना खान आणि आर्यन खानच्या डेब्यूची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. आर्यन खान हे नाव सिनेसृष्टीत पाऊल ठेवण्याआधीच खूप गाजलं. गेल्यावर्षी आर्यन खान ड्रग्सप्रकरणात अडकला होता. या प्रकरणी त्याला बरेच दिवस जेलमध्येही राहावं लागलं होतं. जरी आर्यनने अद्याप इंडस्ट्रीत प्रवेश केलेला नाही पण सोशल मीडियावर त्यांची फॅन फॉलोइंग स्टारपेक्षा कमी नाही. तर दुसरीकडे सुहानाने तिच्या डेब्यू चित्रपटाची तयारी सुरू केली असून आता या यादीत आर्यनचाही समावेश झाला आहे. आर्यन खान वेब सिरीजद्वारे इंडस्ट्रीत पाऊल ठेवणार आहे. वेब सीरिजमध्ये एक्टिंग करण्याऐवजी आर्यन याचं दिग्दर्शन करणार असून त्याचं टेस्ट शूटही सुरू झालं आहे.

एका रिपोर्टनुसार, आर्यन या वेब सीरिजचे दिग्दर्शन आणि लेखनही करत आहे. त्याने आपल्या सिरीजची सगळी जबाबदारी स्वत:वर घेतली असून शुक्रवार-शनिवारी कसोटी शूट सुरू केलं आहे. सिरीजचा एक भाग असल्याने, आर्यनची इच्छा आहे की, संपूर्ण क्रूने एकत्रितपणे हा प्रोजेक्ट समजून घ्यावा जेणेकरुन प्रत्येकाला शूटिंगआधी त्याबद्दल माहिती मिळेल.

आर्यन आहे वेब सीरिजसाठी खूप उत्सुक 
रिपोर्ट्सनुसार, आर्यन खान त्याच्या प्रोजेक्टबद्दल खूप उत्साही आहे आणि त्याने प्री-प्रॉडक्शन काम सुरू केलं आहे. शूटिंगची तारीख लवकरच फायनल होईल. त्यानंतर शूटिंग सुरू होईल. शाहरुख खानने सुरुवातीपासूनच आपला मुलगा आर्यनला अभिनयात रस नसल्याचं सांगितलं आहे. त्याला आपले करिअर दिग्दर्शनात घडवायचं आहे. आर्यन गेल्या चार वर्षांपासून दिग्दर्शन आणि लेखन शिकत आहे. त्याने चित्रपट निर्मितीचं शिक्षणही घेतलं आहे.

सुहाना खानबद्दल बोलायचं झालं तर ती झोया अख्तरच्या वेब सीरिजमधून डेब्यू करणार आहे. या सिरीजमध्ये सुहानासोबत अगस्त्य नंदा आणि खुशी कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तिने तिच्या प्रोजेक्टचं शूटिंग सुरू केलं आहे. अलीकडेच या तिघांचेही सेटवरील फोटो व्हायरल झाले होते. ज्यामध्ये सुहानाला ओळखणं कठीण होत होतं.