Sayali Sanjeev: अशोक सराफ यांचा एक सल्ला अन् सायली संजीवचं आयुष्यच बदललं!

Gost Aka Paithanichi: अशोक सराफ यांनी सायली संजीवला मोलाचा सल्ला (Ashok Saraf Advise To Sayali Sanjeev) दिला होता. मी जेव्हा सिनेसृष्टीत आली त्यावेळी अशोक सराफ यांनी मला सांगितलं होतं की...

Updated: Dec 11, 2022, 12:08 AM IST
Sayali Sanjeev: अशोक सराफ यांचा एक सल्ला अन् सायली संजीवचं आयुष्यच बदललं! title=
Ashok Saraf Sayali Sanjeev

Ashok Saraf Sayali Sanjeev: साधा भोळा चेहरा, काळसर डोळे, माथ्यावर छोटी टिकली ,मराठमोळा पेहराव अन् क्यूट स्माईल, असं वर्णन केल्यावर कोणता चेहरा समोर येत असेल तर तो सायली संजीवचा... असंख्य तरूणांच्या हृदयावर राज्य करणारी, मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सायली संजीव ( Sayali Sanjeev) नेहमी चर्चेत असते. अशातच सध्याही ती चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. त्याला कारण ठरतंय तिचा 'गोष्ट एका पैठणीची' हा चित्रपट. (Ashok Saraf Give Most Important Advise To Marathi Actress Sayali Sanjeev Share Story During Interview)

गोष्ट एका पैठणीची या चित्रपटात (Gost Aka Paithanichi) सायली मुख्य भूमिकेत आहे. त्यामुळे सायली (Sayali Sanjeev) सध्या प्रमोशनसाठी सर्वत्र प्रवास करताना दिसते. एका मुलाखतीमध्ये सायलीने तिच्या यशस्वी होण्यामागे दोन महत्त्वाच्या व्यक्ती असल्याचं सांगितलं होतं. या दोन व्यक्ती म्हणजे सायलीचे वडील संजीव आणि दुसरे सर्वांचे लाडके अशोक सराफ. सायली संजीव अशोक सराफ (Ashok Saraf) यांना पप्पा म्हणून हाक मारते.

अशोक मामांनी दिला होता सल्ला...

अशोक सराफ यांनी सायली संजीवला मोलाचा सल्ला (Ashok Saraf Advise To Sayali Sanjeev) दिला होता. मी जेव्हा सिनेसृष्टीत आली त्यावेळी अशोक सराफ यांनी मला सांगितलं होतं, तू जे काही काम घेतेस त्यात तुझं तू 100 टक्के तुझं योगदान दे. त्यात कोणत्याही प्रकारची तडजोड कधीच करू नकोस. असाच सल्ला सायलीच्या वडिलांनी तिला दिला होता.

आणखी वाचा - स्पॉटलाईट | बिग बींसोबत झळकणार सायली संजीव

दरम्यान, या दोघांनी दिलेला सल्ला मी कटाक्षाने पाळण्याचा प्रयत्न करते, असं सायली म्हणते. मी जे काम करते ते समजून घेऊन काम करते, कोणत्याही कामाला नाही म्हणत नाही, असंही सायली म्हणते. आजही सायलीचे चित्रपट (Sayali Sanjeev Movies) प्रेक्षकांच्या मनात घर करून जातात. काही दिया परदेस ते गोष्ट एका पैठणीची हा प्रवास कधी सोप्पा नव्हता, हे मात्र नक्की...