Sholay : अमिताभ बच्चन, धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'शोले'ने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाने असा रेकॉर्ड बनवला होता की, अनेक वर्षे हा रेकॉर्ड कोणताही चित्रपट मोडू शकला नाही. सोशल मीडियावर तुम्ही या चित्रपटाबद्दल अनेक कथा ऐकल्या असतील, ज्यामध्ये धर्मेंद्र यांनी एका सीनमध्ये खरी बंदूक वापरली होती. पण तुम्हाला माहीत आहे का की या चित्रपटातील अनेक सीन डिलीट करण्यात आले होते. दरम्यान, याच चित्रपटातील एक दृश्य 49 वर्षानंतर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
'शोले' हा चित्रपट 1975 चा सर्वकालीन ब्लॉकबस्टर चित्रपट आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील सदाबहार चित्रपटांमध्ये 'शोले' गणला जातो. आजही काही लोकांना हा चित्रपट पाहायला आवडतो. या चित्रपटात धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन यांची जोडी खूप प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. प्रेक्षकांना चित्रपटाची कथा इतकी आवडली की ते वेडे झाले. शोले' चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटातील अनेक सीन कट केले होते. त्यातील एक सीन सध्या व्हायरल होत आहे.
कोणता आहे ती सीन?
'शोले' चित्रपटातील प्रत्येक डायलॉग हा चर्चेत आला आहे. ज्यामध्ये 'पचास पचास कोस दूर तक कोई बच्चा रोता है तो मां कहती है कि सो जा नहीं तो गब्बर आ जाएगा'. हा डायलॉग खूपच आवडला होता. 'शोले' चित्रपटातील गब्बर म्हणजेच अमजद खान. या पात्राच्या भीतीमुळे 'शोले' चित्रपटातील अनेक डायलॉग आणि सीन डिलीट करण्यात आले होते. त्यामुळे ही सीन चित्रपटात दाखवले गेले नाहीत. सेन्सॉर बोर्डाने हे सीन कट करण्यास सांगितले होते. अशातच आता या चित्रपटातील एक सीन व्हायरल होत आहे, ज्यामध्ये गब्बर सिंगचे निर्दयी रूप स्पष्ट दिसत आहे.
हा फोटो ओल्ड इज गोल्ड नावाच्या इन्स्टाग्राम हँडलवरून शेअर करण्यात आला आहे . सधया हा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. फोटोत अमजद खान उभा दिसत आहे तर सचिन पिळगावकर जवळच जमिनीवर पडलेले दिसतात. या चित्रपटात सचिनने अहमदची भूमिका साकारली होती. फोटोमध्ये गब्बर सचिनला केसांनी वर खेचत असल्याच दिसत आहे. त्याचबरोबर आजूबाजूला डाकूंचा ताफा दिसत आहे. हा सीन चित्रपटातून कट करण्यात आला आहे. कारण या सीनमध्ये हिंसाचार होता आणि गब्बर क्रूर दिसत होता.