Malaika Arora Adventure : अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या बोल्ड-ग्लॅमरस लूक्ससोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठीही चर्चेत असते. पण यावेळी मलायका अरोरा तिच्या लूकमुळे किंवा लव्ह लाईफमुळे नव्हेतर चाहत्यांना अजिबात अपेक्षित नसलेल्या गोष्टीमुळे चर्चेचा भाग बनली आहे. होय... मलायका अरोरा हिने वयाच्या ४८ व्या वर्षी असे धाडस केलं आहे, जे पाहिल्यानंतर चाहत्यांनी श्वास रोखून धरला आहे असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मलायकाचा एडवेंचर व्हिडीओ
मलायका अरोराने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये मलायका अरोरा अप्रतिम स्काय डायव्हिंग करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये, मलायकाने पांढरा टी-शर्ट आणि काळी हाफ टाइट परिधान करून खुल्या आकाशात हेलिकॉप्टरमधून उडी मारताना दिसत आहे. स्कायडायव्हिंगच्या या व्हिडिओसोबत मलायकाने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, '48 मध्ये एक मजबूत उडी'. माझ्या वाढदिवशी स्काय डायव्हिंगची एक वेगळीच क्रेझ आहे. असा अनुभव ज्याने मला नेहमीच धाडसाचा पाठपुरावा करण्याची आणि विलक्षण गोष्टी स्वीकारण्याची आठवण करून देते.
मलायकाचा व्हिडिओ व्हायरल
मलायका अरोराचा हा नवा धाडसाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यावर चाहते जोरदार कमेंट करत आहेत. जरी मलायका अरोरा सध्या बॉलिवूड चित्रपटांपासून दूर असली तरी तिने अनेक चित्रपटांमध्ये तिच्या खास अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. याचबरोबर तिच्या आयटम साँन्गने प्रेक्षकांना भुरळ घातली होती.
मलायकाचा वर्क फ्रंट
जर आपण मलायका अरोराच्या वर्क फ्रंटवर नजर टाकली तर, आजकाल बॉलीवूड दिवा फराह खानसोबत टीव्ही डान्स रिअॅलिटी शो झलक दिखला जा मध्ये शो जज करताना दिसत आहे. याआधी मलायकाने इंडियाज बेस्ट डान्सर, इंडियाज गॉट टॅलेंट सारख्या शोजला जज केलं आहे. अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अर्जुन कपूर (Arjun Kapoor) हे बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या जोड्यांपैकी एक आहे. या दोघांच्या नात्याबद्दल, लग्नाबद्दल, अनेकदा सोशल मीडियावर चर्चंना उधाण येते.
LIVE|
LSG
146(20 ov)
|
VS |
RCB
123/5(12.5 ov)
|
| Full Scorecard → | ||
|
CSK
(20 ov) 192/5
|
VS |
KKR
160/7(20 ov)
|
| Chennai Super Kings beat Kolkata Knight Riders by 32 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
SRH
(20 ov) 216/6
|
VS |
RR
159(19 ov)
|
| Sunrisers Hyderabad beat Rajasthan Royals by 57 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
RCB
(20 ov) 240/4
|
VS |
MI
222/5(20 ov)
|
| Royal Challengers Bengaluru beat Mumbai Indians by 18 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.