22 वर्षांपूर्वी झाला होता KBC चा पहिला करोडपती, आता करतो 'हे' काम

1st Crorepati Kaun Banega Crorepati : 'कौन बनेगा करोडपती' च्या 2000 मध्ये प्रदर्शित झालेल्या शोचा पहिला करोडपती. आज काय काम करतो माहितीये?

दिक्षा पाटील | Updated: Oct 30, 2023, 02:38 PM IST
22 वर्षांपूर्वी झाला होता KBC चा पहिला करोडपती, आता करतो 'हे' काम title=
(Photo Credit : Social Media)

1st Crorepati Kaun Banega Crorepati : 'कौन बनेगा करोडपी' या शोचं नाव जरी घेतलं तरी आपण विचारात पडतो की यंदाच्या सीझनमध्ये कोण कोट्यावधी होणार. सगळ्या प्रश्नांची उत्तर देत कोट्यावधी होणाऱ्या लोकांची संख्या ही खूप कमी असते. आज आपण अशाच एका करोडपती विषयी जाणून घेणार आहोत. ही व्यक्ती 22 वर्षांपूर्वी कौन बनेगा करोडपतीमध्ये दिसला होता आणि तो कोट्याधीश देखील झाला होता. आज ही व्यक्ती काय करते ते जाणून घेऊया. 

ती व्यक्ती कोण?

हर्षवर्धन नवाथे असे या व्यक्तीचे नाव आहे. हर्षवर्धन हा 2000 मध्ये प्रदर्शित झालेल्या शो चा पहिला करोडपती होता. हर्षवर्धन नवाथेचं स्वप्न होतं की त्यानं यूपीएससी परिक्षा देईल आणि ती चांगल्या पद्धतीनं पास करून आयएएस अधिकारी होईल. पण तो आयएएस अधिकारी होऊ शकला नाही. जेव्हा हर्षवर्धन या शोमध्ये आला होता तेव्हा त्याचं लग्न झालं नव्हतं. तो अविवाहीत होता आणि यूपीएससीची तयारी करत होता. 

करोडपती झाल्यानंतर हर्षवर्धननं काय केलं?

जेव्हा हर्षवर्धन शोमध्ये एक कोटी रुपया जिंकला तेव्हा तो पुढच्या शिक्षणासाठी परदेशात गेला. त्यासोबत त्यानं 'कौन बनेगा करोडपती' मध्ये जिंकलेलेल पैसे चांगल्या प्रकारे इन्व्हेस्ट केले. खरंतर हा शो जिंकल्यानंतर हर्षवर्धन सेलिब्रिटी झाला होता. त्याला वेगवेगळ्या ठिकाणांहून ऑफर येऊ लागल्या होत्या. त्यात अभिनय आणि मॉडेलिंगच्या देखील ऑफर होत्या. याशिवाय त्याला अनेक ठिकाणी चिफ गेस्ट म्हणून देखील बोलावण्यात आले होते. 

हेही वाचा : रजनीकांत विमानतळावर आले आणि शांतपणे स्वत:ची बॅग उचलून निघाले; सुपरस्टारचा साधेपणा पाहून भलेभले लाजले

आता काय करतोय हर्षवर्धन?

हर्षवर्धन हा एमएनसीमध्ये काम करतो. त्यानं मराठी अभिनेत्री सारिका हर्षवर्धन नवाथेशी लग्न केलं. दोघांना 2 मुलं आहेत. त्यांचा मोठा मुलगा हा 14 वर्षांचा असून छोटा हा 10 वर्षांचा आहे. आजही हर्षवर्धनला वाटतं की जर तो शो जिंकला नसता तर तो आयएएस असता.