कॅन्सरचा प्रवास सांगत अतुल परचुरे म्हणाले, "लग्नाच्या 25 व्या वाढदिवशी आम्ही..."

Atul Parchure Cancer : अतुल परचुरे यांना कॅन्सरचे निदान झाल्यानंतर त्याच्या घरच्यांची या बातमीवर कशी प्रतिक्रिया दिली आणि त्यातून ते बाहेर कसे आले याविषयी सांगितले आहे. अतुल परचुरे यांनी दिलेल्या या माहितीनंतर अनेकांना आश्चर्य झालं आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Jul 15, 2023, 04:17 PM IST
कॅन्सरचा प्रवास सांगत अतुल परचुरे म्हणाले, "लग्नाच्या 25 व्या वाढदिवशी आम्ही..." title=
(Photo Credit : Social Media)

Atul Parchure Cancer : हिंदी आणि मराठी मनोरंजनविश्वातील अभिनेता अतुल परचुरे हे त्यांच्या अभिनयासाठी ओळखले जातात. 'कॉमेडी नाइट्स विद कपिल' आणि 'माझा होशील ना' अशा मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. अतुल परचुरे यांना कॅन्सरचं निदान झाल्याचं म्हटलं आहे. त्यांनी त्यांच्या लक्षणांविषयी सांगितले. पण इच्छाशक्तीच्या जोरावर ते यातून बाहेर पडले. कॅन्सर झाल्यानंतर त्यांनी याबद्दल फार कुठे सांगितलं नाही. दरम्यान, आता अखेर अतुल परचुरे यांनी त्यांचा हा संपूर्ण प्रवास सांगितला आहे. 

युट्यूबवरच्या ‘मित्र म्हणे’ पॉडकास्ट या कार्यक्रमात सौमित्र पोटेंनी घेतलेल्या मुलाखतीत त्यांचा कॅन्सरचा हा प्रवास सांगितला आहे. "आमच्या लग्नाचा 25 वा वाढदिवस होता, म्हणून आम्ही सगळे न्यूझीलँडला गेलो होतो. तिथे मला खाण्याचा नॉशिया येऊ लागला. बाकी सगळं नीट चाललं होतं. पण खायचं म्हटलं की नॉशिया येऊ लागला. मला वाटलं की ही माझ्यासाठी धोक्याची घंटा आहे. त्यानंतर वाटलं की कावीळ झाली आहे. मग तिथल्या माझ्या एका डॉक्टर मित्राने मला सांगितलं की आपण अल्ट्रा सोनोग्राफी करुन बघू. अल्ट्रा सोनोग्राफी केली. डॉक्टरांच्या चेहऱ्यावरचे बदलते भाव मला समजत होते, त्यावेळी मला कळलं की ही कावीळ नाही त्यापेक्षा गंभीर काहीतरी झालं आहे." 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पुढे याविषयी सांगताना अतुल परचुरे म्हणाले, "मी दुसऱ्या दिवशी जेव्हा सिटी स्कॅन करण्यासाठी डॉक्टरांकडे गेलो तेव्हाही डोक्यात नव्हतं की आपल्याला कॅन्सर वगैरे असेल. सिटी स्कॅन केल्यानंतर मला डॉक्टर म्हणाले उद्या आपण MRCP करु. मी त्यांना विचारलं डॉक्टर सांगा ना काय झालं आहे? तर डॉक्टर म्हणाले उद्या कळेलच आपल्याला सगळं. ती टेस्ट केली, त्यानंतर मला समोर बसवलं. ते मला म्हणाले की आता वारंवार काही शब्द ऐकायची तयारी ठेवा. डॉक्टर मला म्हणाले की तुमच्या लिव्हरमध्ये आम्हाला एके ठिकाणी ट्युमर दिसतो आहे. तो ट्युमर साधारण पाच सेमीचा आहे. तुम्ही काळजी घ्या. मी तेव्हा त्यांना विचारलं की मॅलिग्नंट आहे का? म्हटलं म्हणजे कॅन्सर झाला आहे का? तर ते म्हणाल हो. मी त्यांना विचारलं की मी यातून बाहेर पडू शकतो का? तर डॉक्टर मला म्हणाले की तू बाहेर पडशील पण माझ्यापेक्षा तुला कॅन्सर स्पेशलिस्ट हे जास्त चांगल्या पद्धतीनं सांगतील. त्यानंतर मी ते रिपोर्ट घेऊन घरी आलो."

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : 'लस्ट स्टोरीज 2' साठी तमन्नाबरोबर प्रेमाचं नाटक? Vijay Varma म्हणाला, "आता माझ्या आयुष्यात..."

घरी आल्यानंतर पत्नी आणि आईला या विषयी सांगत अतुल म्हणाले, "सोनियाला मी सांगितलं होतं की ट्युमर वगैरे आहे. पण घरी आल्यानंतर मी सर्वात आधी आईला सांगितलं. डॉक्टरांनी मला सांगितलं आहे की कॅन्सर आहे. तर आई म्हणाली हो? मग डॉक्टर काय म्हणाले? मी आईला सांगितलं की डॉक्टर म्हणत आहेत की दोन-तीन प्रोसिजर्स आहेत ते झालं की तुमच्या लिव्हरची साईझ वाढेल मग आपण ते काढून टाकू. काढून टाकू म्हणालेत ना डॉक्टर मग लक्षात ठेव तुला काहीच होणार नाही काळजी करु नकोस असं मला आईने सांगितलं. सोनियाला कॅन्सर झाल्याचं सांगितलं तेव्हा ती पण हेच म्हणाली की तुला काहीच होणार नाही. त्या क्षणी मला एक गोष्ट जाणवली की तुमची कशावर तरी श्रद्धा हवी. मग ती पुस्तकावर असो, देवावर असो, स्वामी समर्थांवर असो, येशूवर, अल्लावर कुणावरही असो पण ती हवी आणि 100 टक्के हवी. माझी आई, बायको आणि माझी मुलगी या माझ्या तीन सपोर्ट सिस्टिम आहेत. माझी त्यांच्यावर पूर्ण श्रद्धा आहे." तर अतुल यांनी कॅन्सरशी यशस्वी लढा दिला आहे.