अभिजीत बिचुकलेंची बोलून दाखवलं फाडफाड इंग्रजी, अवधुत गुप्तेंना हसू आवरेना; पाहा Video

Abhijit Bichukale Viral Video : अवधुत गुप्ते होस्ट करत असलेल्या ‘खुपते तिथे गुप्ते’ या (Khupte Tithe Gupte) कार्यक्रमात अभिजीत बिचुकलेने हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी फाडफाड इंग्रजी देखील बोलून दाखवली.

Updated: Sep 6, 2023, 12:10 AM IST
अभिजीत बिचुकलेंची बोलून दाखवलं फाडफाड इंग्रजी, अवधुत गुप्तेंना हसू आवरेना; पाहा Video title=
Abhijit Bichukale, Khupte Tithe Gupte

Abhijeet Bichukle In Khupte Tithe Gupte :  'झी मराठी' वाहिनीवरील प्रसिद्ध मालिका 'खुपते तिथे गुप्ते' सध्या वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. यंदाचे या मालिकेचेही हे तिसरं सिझन आहे. 4 जूनपासून या नव्या पर्वाला सुरूवात झाली आहे. अशातच आता अवधुत गुप्ते (Avadhut Gupte) होस्ट करत असलेल्या या कार्यक्रमात बिग बॉस मराठी 2 चे स्पर्धक अभिजित बिचुकले (Abhijeet Bichukle) यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी अभिजीत बिचुकले यांनी अवधुत गुप्ते यांच्या प्रश्नांची सुतासारळी सरळ उत्तर दिली. त्याचाच एक व्हिडीओ (Viral Video) सध्या समोर आला आहे.

बिग बॉस मराठीमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या अभिजीत बिचुकले यांनी राडा धुरळा गाण्यावर दणक्यात एन्ट्री मारली. अवधुत गुप्ते यांनी अभिजित बिचुकले यांचं जोरदार स्वागत केलं. त्यावेळी गप्पा सुरू झाल्या. मी  इंग्रजी असं बोलतो ना की, मी बोललेले शब्द डिक्शनरीमध्ये कुठं लिहीलं आहेत हे कळणार नाही, असं बिचुकले म्हणतात. त्यानंतर त्यांनी The politics kind of what, struggle of existence असं बिचुकले म्हणतात. बिचुकलेंचं हे शब्द ऐकून गुप्तेंचा हसू आवरलं नाही. एवढं फाडफाड इंग्रजी बोलायला लागलात की, मला आता कौतुकाने काय करावं हेच कळतं नाहीये, असं अवधुत गुप्ते म्हणतात.

अभिजीत बिचुकले यांचं इंग्रजी ऐकून अवधुत गुप्ते यांनी थेट कार्यकर्त्यांना बोलवलं अन् बिचुकले यांच्या गळ्यात भलामोठा फार घातला. एवढंच नाही तर कार्यकर्त्यांनी बिचुकले यांना उचलून घेतलं. त्याचा व्हिडीओ समोर आला आहे. सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हिडीओ शेअर होतोय. त्यामुळे आता आगामी एपिसोडबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचल्याचं पहायला मिळतंय.

पाहा Video

दरम्यान, खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा तूफान प्रतिसाद मिळाला आहे. अनेक दिग्गज या सिझनमध्ये आपल्याला पाहायला मिळाले आहेत. राज ठाकरे यांच्यानंतर अभिनेता श्रेयस तळपदे, नेते नारायण राणे, खासदार संजय राऊत, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर अशांनी या सिझनमधून हजेरी लावली होती. अशातच आता बिचुकले यांच्या आगमनाने चार चांद लागल्याचं पहायला मिळतंय.