सिनेमाच्या प्रमोशनसाठी केली 'कंडोम राईड'

बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर यांचा 'शुभ मंगल सावधान' हा सिनेमा १ सप्टेंबर रोजी म्हणजे आज प्रदर्शित झाला. नुकतंच या दोघांनी सिनेमाच्या प्रमोशनसाठी एक हटके अंदाज निवडला. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Sep 1, 2017, 04:44 PM IST
सिनेमाच्या प्रमोशनसाठी केली 'कंडोम राईड'

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर यांचा 'शुभ मंगल सावधान' हा सिनेमा १ सप्टेंबर रोजी म्हणजे आज प्रदर्शित झाला. नुकतंच या दोघांनी सिनेमाच्या प्रमोशनसाठी एक हटके अंदाज निवडला. 

भूमी आणि आयुष्यमान या सिनेमाच्या प्रमोशनसाठी "कंडोम राईड" करताना दिसले. आयुष्यमानने हे फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. ज्यामध्ये हे दोघे कंडोमशी मिळती जुळती असलेल्या बाईकवरून सवार होताना दिसत आहेत. आणि या फोटोसोबत त्याने कॅप्शन दिलं आहे की सावधान राहा, कंडोमचा वापर करा. 

या सिनेमात आयुष्मान "मुदित" आणि भूमी "सुगंधा" ची भूमिका साकारत आहे. हा सिनेमा सुप्रसिद्ध तामिळ सिनेमा 'कल्याण समयाल साधम' चा रिमेक आहे. दिग्दर्शक आर एस प्रसन्ना यांनी 'शुभ मंगल सावधान' या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून याची निर्मिती आनंद एल राय यांनी केली आहे.