मुंबई : मुंबई हायकोर्टाने गुरूवारी २०१३ मध्ये अभिनेत्री जिया खान हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अभिनेता सूरज पांचोली याच्यावर खटला दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
न्यायमूर्ती आर.एम. सावंत आणि संदीप शिंदे यांच्या खंडपीठाने जियाची आई राबिया खानकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना हे आदेश दिले. राबिया यानी आपल्या याचिकेत मागणी केली होती, वकिल दिनेश तिवारी याना याप्रकरणात विशेष लोक अभियोजक म्हणून नियुक्त केले जावे.
हायकोर्टाने राबियाच्या याचिकेवर सुनावणीसाठी ११ सप्टेंबरची तारीख दिली आहे. जियाने ३ जून २०१३ मध्ये आत्महत्या केली होती. याप्रकरणी सूरजला १० जून २०१३ ला अटक करण्यात आले होते. नंतर त्याला जामिनावर सोडण्यात आले.
राबियाच्या याचिकेवर हायकोर्टाने जुलै २०१४ मध्ये या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे देण्यात आली होती. सीबीआयने याप्रकरणी आरोपपत्र दाखल केलं आणि सूरजवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला. त्यानंतर राबिया यानी पुन्हा एकदा याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटीची समिती नेमण्याची मागणी केली होती.
जिया खानने आत्महत्या केली, या सीबीआयच्या निष्कर्षावर राबिया यांचा विश्वास नाही. मुंबई पोलिसांनी देखील या प्रकरणाला आत्महत्याच म्हटले आहे. त्यामुळे एसआयटी समिती नेमण्याची राबिया यांची मागणी फेटाळण्यात आली होती.