close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

आयुष्मानही अजय, रणवीरच्या वाटेवर...

आयुष्यमान अनुभव सिन्हाच्या आगामी 'आर्टिकल १५' चित्रपटात दिसणार आहे

Updated: Mar 6, 2019, 04:42 PM IST
आयुष्मानही अजय, रणवीरच्या वाटेवर...

मुंबई : गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'बधाई हो' आणि 'अंधाधुन' चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर आभिनेता आयुष्यमान खुरानाने बॉलिवूडमध्ये आपली नवी ओळख निर्माण केली. बॉलिवूडमध्ये आयुष्यमान खुराना नेहमी चर्चेत राहणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. आयुष्यमानने नेहमीच विविध चित्रपटातून वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. आता पुन्हा एकदा आयुष्यमान एका वेगळ्या भूमिकेत दिसणार असून त्याच्या नवीन लुकने चाहत्यांना सरप्राइज केले आहे. 

आयुष्यमान 'ड्रीम गर्ल' या चित्रपटातून अभिनेत्री नुसरत भरूचासह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची चर्चा असतानाच आता आयुष्यमान अनुभव सिन्हाच्या आगामी 'आर्टिकल १५' चित्रपटात एका पोलिसाची भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी त्यांच्या ट्विटरवरून आयुष्यमानचा पोलीसांच्या गणवेशातील फर्स्ट लुक शेअर केला आहे. या लुकमध्ये आयुष्यमान वेगळ्या अंदाजात दिसत आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण लखनऊमध्ये होणार आहे. आयुष्यमानच्या या नवीन लुकची बॉलिवूडमध्ये चर्चा होत आहे.

'आर्टिकल १५' चित्रपटात आयुष्यमान प्रमुख भूमिका साकारणार असून ईशा तलवार, सयानी गुप्ता, मोहम्मद जीशान अय्यूब आणि कुमुद मिश्राही चित्रपटात दिसणार आहेत. चित्रपटसृष्टीत आयुष्यमानला मोठ्या चित्रपटांच्या ऑफर मिळत आहेत. आयुष्यमानच्या चित्रपटांनी गेल्या वर्षी बॉक्सऑफिसवर चांगला गल्ला जमवला होता. गेल्या वर्षीप्रमाणेच यंदा आयुष्यमानचे चित्रपट बॉक्सऑफिसवर काय कमाल करणात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.