close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

सूर्या आणि गीताच्या लग्न सोहळ्याचे फोटो

पाहा खास सोहळा 

सूर्या आणि गीताच्या लग्न सोहळ्याचे फोटो

मुंबई : सध्या लग्न सराईचा मौसम सुरु आहे .रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या झी युवा या वाहिनीवर सुद्धा सध्या लग्नाची धावपळ सुरु आहे नुकतेच फुलपाखरू मालिकेत मानस आणि वैदेहीचे ग्रँड वेडिंग झाले .आता बापमाणूस या मालिकेत नुकतेच सूर्या आणि गीताच्या च्या लग्नाचा बार उडाला आहे . सध्या दादासाहेब घरात नसल्यामुळे आईसाहेबांनी पुढाकार घेत सूर्या आणि गीताचे लग्न लावले . या दोघांचे लग्न अगदी ग्रँड नसेल तरीही अतिशय चांगल्या प्रकारे हा सोहळा पार पडला .

या मालिकेने नुकताच २०० भागांचा यशस्वी टप्पा गाठला. नुकतेच प्रेक्षकांनी मालिकेत पाहिले की दादासाहेबांच्या जागेवर विराजमान होत आईसाहेबांना आता सर्व सूत्र स्वतःच्या हातात घेतली आहेत. सध्या मालिकेत एक अनोखे वळण प्रेक्षकांनी पाहिले. शालूचा खरा चेहरा सगळ्या समोर आल्या नंतर शब्बीर आणि गीताला सन्मानाने वाड्यात आणल गेलं. . गीताने  त्यासाठी सूर्याचे आभार मानले . गीता वाड्यात नसताना  घर किती सुनं वाटायचं आणि तिची खूप आठवण येत असल्याची कबुली सुद्धा सूर्याने  गीताला दिली . आणि आईसाहेबांनी ऐकून सगळ्यां समोर सूर्या आणि गीताच्या लग्नाची घोषणा केली.होती .

घरातील बापमाणसाची सत्ता आणि मान मिळवण्यासाठी चाललेल्या राजकारणावर आधारित या मालिकेने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे.  पाहायला विसरू नका बापमाणुस सोमवार ते शनिवार 8.30 वाजता फक्त आपल्या झी युवा वर