ऋषी कपूरने रणबीरच्या लग्नाबाबत केला मोठा खुलासा

काय म्हणाले ऋषी कपूर 

ऋषी कपूरने रणबीरच्या लग्नाबाबत केला मोठा खुलासा  title=

मुंबई : मोठ्या पडद्यावरील कलाकारांच खाजगी आयुष्य हे कायमच चर्चेत असतं. असंच बॉलिवूडमध्ये लवबर्ड म्हणून ओळखले जाणारे रणबीर - आलिया सध्या खूप चर्चेत आहेत. हे दोन्ही कलाकार लवकरच 'ब्रम्हास्त्र' या सिनेमात दिसणार आहे. मात्र आता त्यांच्या रिअर लाईफमधील रोमान्सची देखील चर्चा रंगली आहे. सिनेमाच्या सेटप्रमाणेच हे दोघे बाहेर मु्व्ही डेट किंवा डिनर डेटला एकत्र पाहायला मिळतात. असं म्हटलं जातं की, हे दोघे लवकरच लग्न करणार आहेत. 

रणबीरचे वडिल अभिनेते ऋषी कपूर यांनी आलिया भट्टबाबत एक खास गोष्ट शेअर केली आहे. एका मुलाखतीत ऋषी कपूर म्हणाले की, रणबीर - आलियाच्या नात्याला सहमती देत ऋषी कपूर म्हणाले की, रणबीर ज्याला हवं त्याला आपला जोडीदार म्हणून निवडू शकतो. पुढे म्हणाले की, हे रणबीरचं आयुष्य आहे. त्याला ज्याच्याशी लग्न करायचं त्याच्यासी करू शकतो. तसेच आलिया भट्टला नीतू कपूर पसंत करतात हे देखील अनेकदा स्पष्ट झालं आहे. रणबीर कपूरची निवड मला आवडली असल्याचं देखील ते म्हणाले. 

या महेश भट्ट यांनी देखील या नात्याला सहमती दिली आहे. वडिल म्हणून मला आनंद असल्याचं त्यांनी सांगितलं. आलियाने स्वतःचे निर्णय आतापर्यंत स्वतः घेतले आहेत. लग्न हे आलियाची खाजगी गोष्ट आहे त्यामुळे तीच याचा निर्णय घेणार असल्याचं सांगितलं आहे. मी माझ्या मुलांच्या खाजगी आयुष्यात कधी डोकावलं नाही.