... म्हणून बाबा रामदेव यांनी सुशांतसाठी केला यज्ञ

सुशांतने १४ जून रोजी वांद्रे येथील राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली.   

Updated: Aug 16, 2020, 12:39 PM IST
... म्हणून बाबा रामदेव यांनी सुशांतसाठी केला यज्ञ

मुंबई : योग गुरू बाबा रामदेव यांनी दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतसाठी यज्ञ केला.  बाबा रामदेव यांनी यज्ञाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या यज्ञाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. सुशांतने १४ जून रोजी वांद्रे येथील राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येनंतर त्याचे अनेक जुने फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. महत्त्वाचं म्हणजे त्याच्या आत्महत्येला दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला. मुंबई पोलीस, बिहार पोलीस अन् आता ईडीमार्फत या प्रकरणाची चौकशी केली जात आहे.

दरम्यान, बाबा रामदेव यांनी सुशांतसाठी केलेल्या यज्ञाचा व्हिडिओ  शेअर करत कॅप्शनमध्ये 'मी सुशांतच्या नातेवाईकांसोबत चर्चा केली. त्यांच्या वेदना ऐकून माझ्या मनाचा थरकाप उडाला. आम्ही सर्व मिळून पतंजलीमध्ये सुशांतच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थना करत आहोत.' असं लिहिलं आहे. 

शिवाय सुशांतला आणि त्याच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा हिच ईश्वर चारणी प्रार्थना करत असल्याचं देखील बाबा रामदेव म्हणाले आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.  

सुशांतच्या आत्महत्येला दोन महिने झाले आहेत. अद्याप या प्रकरणाची घडी उघडलेली नाही. त्यामुळे या प्रकरणाची CBI चौकशी करावी अशी मागणी सगळ्याच स्तरावरून होत आहे.