मुंबई : ज्या दिवशी देश स्वातंत्र्य झाला अगदी त्याच दिवशी पश्चिम बंगालमध्ये अभिनेत्री म्हणून लोकप्रिय झालेली राखी गुलजार यांचा जन्म झाला. राखीच्या वडिलांची आर्थिक स्थिती चांगली नव्हती. राखीला शिक्षण घ्यायचं होतं. तिला शास्त्रज्ञ व्हायचं होतं. मात्र कुटुंबाची परिस्थिती चांगली नव्हती. कमी वयातच बांगला सिनेमात काम करण्याची संधी चालून आल्यामुळे ती नाकारू शकली नाही.
२० व्या वर्षी राखीने बॉलिवू़डमध्ये पदार्पण केलं. 'जीवन मृत्यू' हा राखी यांचा पहिला सिनेमा होता. यानंतर लागोपाठ त्यांना सिनेमे मिळत गेले. त्यानंतर त्या कोलकाता येथे गेल्या नाहीत. राखीला ओळखणारे सांगतात की, ६० आणि ७० च्या दशकातील सर्वात टॉप हिरोईन असूनतही त्यांच्या स्टारचे नखरे अजिबात नव्हते.
राखी यांच्या आजूबाजूला कवी, पत्रकार आणि वेगवेगळ्या तज्ज्ञ माणसांचा घोळका असायचा. इतर अभिनेत्रींप्रमाणे त्या शॉपिंग, गॉसिपिंग करत नसतं. सिनेमा "करण-अर्जुन' मध्ये सलमान आणि शाहरूख खानच्या आईची भूमिका साकारली. रात्री यांचा पहिला विवाह पत्रकार अजय बिस्वास लग्न झालं होतं. पण ते लग्न अगदी काही दिवसांतच तुटलं.
स्वातंत्र्यावर सर्वाधिक अधिक प्रेम
स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी जन्मलेली राखी कायमच आपल्या विचारांवर जगली. तिला तिच्या आयुष्यात कुणीही बदल केलेला आवडत नाही. याच कारणामुळे राखीने तिच्या पहिल्या नवऱ्यासोबत राहणं पसंत केलं नाही. राखीने कधीच आपली ग्लॅमरस ओळख ठेवली नाही. सेटवर देखील ती कायमच लोकांसोबत असायची. सगळ्यांसोबत गप्पा मारायची.
राखी यांची लेखक, दिग्दर्शक गुलजार यांच्याशी खूप चांगली मैत्री झाली. दोघांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. एक वर्षानंतर त्यांना बोस्की म्हणजे मेघना गुलजार ही मुलगी झाली. गुलजार यांना वाटतं होतं की, राखी यांनी सगळं सोडून कुटुंबाकडे लक्ष द्यावं.
राखीला जे अगदी जवळून ओळखतात त्यांना माहित आहे की, राखी खूपच प्रोफेशनल आहे. राखी अतिशय काम मन लावून काम करणारी आहे. सिनेमात काम करून मजा येत होती तोपर्यंत त्यांनी काम केलं त्यानंतर काम करणं बंद केलं. आता त्या मुंबई जवळ असलेल्या पनवेलमध्ये शेती सुरू केली आहे. आपलं फार्म हाऊसमध्ये गाय, घोडे, कुत्रा आणि अनेक प्राणी पाळले आहेत.