मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या टीव्ही शोची प्रसिद्ध अभिनेत्री मुनमुन दत्ता सध्या अडचणीत आहे. काही दिवसांपूर्वी तिला अटक झाली होती. त्यामुळे सर्वत्र एकच चर्चा सुरु झाली. अभिनेत्रीनं असं काय केलं असावं असा प्रश्न प्रत्येकाला पडला होता. तिच्या चाहत्यांसाठी देखील ही धक्कादायक माहिती होती. परंतु चार तासांनंतर अभिनेत्रीची सुटका करण्यात आली. अशी ही बातमी काही तासांनंतर आली. मात्र आता या प्रकरणावर लोकांना अनेक प्रश्न पडू लागले आहे. ही अटक नक्की कशासाठी झाली. पोलीस मुनमुन दत्ताला का घेऊन गेले? यावर स्वत: अभिनेत्रीनं वक्तव्य केलं आहे आणि आपल्या अटके मागचं कारण स्पष्ट केलं आहे.
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कॉमेडी शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये बबिता जीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता सध्या अडचणींचा सामना करत आहे. तिच्यावर दलित समाजातील लोकांवर जातीय टिप्पणी केल्याचा आरोप आहे.
त्यामुळे मुनमुन दत्तावर हरियाणातील हांसी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाबाबत अलीकडेच अशी अफवा पसरली होती की, मुनमुन दत्ताला हरियाणा पोलिसांनी अटक केली आहे.
मुनमुन दत्ताने सत्य सांगितले
आता अभिनेत्रीनेच अशा अफवांवर प्रतिक्रिया दिली आहे. मुनमुन दत्ताने बॉलीवूड बबल या इंग्रजी वेबसाइटशी संवाद साधला. यावेळी तिच्याविरुद्ध सुरू असलेला खटला आणि त्यासंबंधित अफवांबद्दल सविस्तर चर्चा केली. तेव्हा मुनमुन दत्ताने सांगितले की, तिला पोलिसांनी हंसीमध्ये अटक केली नसून ती नियमित चौकशीसाठी पोलिस ठाण्यात गेली होती.
मुनमुन दत्ता म्हणाली, "मला अटक करण्यात आल्याचा दावा करणाऱ्या अफवांच्या विरोधात, मी हे स्पष्ट करू इच्छितो की, मी पोलिस अधिकाऱ्यांसोबत नियमित चौकशीसाठी गेलो होतो. मला अटक झाली नाही. तर मला चौकशीसाठी जाण्यापूर्वीच शुक्रवारी कोर्टातून अंतरिम जामीन मिळाला.
हांसी पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी माझी अडीच तास चौकशी केली. मी पोलिसांना सहकार्य करत आहे आणि यापुढेही करत राहीन.
मुनमुन दत्ताने सांगितले की, ती स्वतःबद्दलच्या अफवा आणि बातम्यांमुळे अस्वस्थ झाली आहे. ती म्हणाली, 'फक्त हेडलाइन्सच्या निमित्ताने या प्रकरणाभोवती बातम्या दिल्या जात असल्याने मी अस्वस्थ झाली आहे. तसेच, मी मीडिया व्यावसायिकांना विनंती करतो की, या प्रकरणाभोवती खोट्या बातम्या निर्माण करू नयेत.'
मुनमुन दत्ताने गेल्या वर्षी ९ मे रोजी तिच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडीओ जारी केला होता. ज्यामध्ये तिने अनुसूचित जातीच्या समाजाबद्दल अपमानास्पद टिप्पणी केली होती. यासंदर्भात दलित हक्क कार्यकर्ते आणि वकील रजत कलसन यांनी 13 मे रोजी हांसी पोलीस ठाण्यात एससी एसटी कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता