सुपरहिट बागबान सिनेमातील अभिनेता-पत्नीचा अपघात, रुग्णवाहिकेची धडक

भरधाव रुग्णवाहिका आणि कारची धडक, बागबाग फेम अभिनेता-पत्नी जखमी, रुग्णालयात उपचार सुरू

Updated: May 16, 2021, 12:39 PM IST
सुपरहिट बागबान सिनेमातील अभिनेता-पत्नीचा अपघात, रुग्णवाहिकेची धडक

मुंबई: एकेकाळी सुपरहिट झालेला बागबाग सिनेमातील अभिनेता आणि त्याच्या पत्नीचा अपघात झाला आहे. महानायक अमिताभ बच्चन यांच्या सिनेमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता साहिल चड्डा आणि त्याच्या पत्नीचा अपघात झाला आहे. साहिलच्या गाडीची आणि रुग्णवाहिकेची धडक झाल्यानं त्यांचा अपघात झाला. या अपघातात अभिनेता साहिलच्या पत्नीला दुखापत झाली आहे. 

अपघातानंतर साहिल आणि त्याच्या पत्नीला उपचारासाठी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. पत्नीच्या दोन्ही पायांना फ्रॅक्चर असल्याची माहिती मिळाली आहे. साहिल आणि त्याची पत्नी कारने निघाले असताना समोरून येणाऱ्या रुग्णवाहिकेला धडक झाली. या अपघातात दोघांनाही दुखापत झाली आहे. 

काही दिवसांपूर्वी साहिल आणि प्रेमिला दोघांनाही कोरोनाची लागण झाली होती. 20 दिवस क्वारंटाइन झाल्यानंतर दोघांची प्रकृती ठणठणीत बरी झाली होती. देवाच्या कृपेनं मोठा अपघात टळला असं म्हणत साहिलनं देवाचे आभार मानले आहेत. पोलिसांनी रुग्णवाहिका चालवणाऱ्याला ताब्यात घेतल्याची माहिती मिळाल्याचं साहिलने सांगितलं आहे. 

सहिल चड्डाचे बागबान, सेक्शन 375 थोडी लाइफ थोडी मॅजिक सिनेमे खूप गाजले. बागबान या सिनेमातून त्याची भूमिका घराघरात पोहोचली. साहिलची प्रकृती सध्या ठिक असून 4 दिवसांत रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल अशी आशा व्यक्त केली आहे.