बाहुबली फेम प्रभासचं सगळ्यात मोठं स्वप्न उतरलं सत्यात

बाहुबली फेम अभिनेता प्रभासला आज कोणत्याही विशेष ओळखीची गरज नाही.

Updated: Feb 19, 2022, 05:32 PM IST
बाहुबली फेम प्रभासचं सगळ्यात मोठं स्वप्न उतरलं सत्यात title=

मुंबई : बाहुबली फेम अभिनेता प्रभासला आज कोणत्याही विशेष ओळखीची गरज नाही. सध्या प्रभास त्याच्या आगामी 'राधे श्याम' या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. प्रभासने नुकतंच उघड केलं आहे की, त्याचं एक मोठं स्वप्न अखेर पूर्ण झालं आहे. अलीकडेच अभिनेत्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. जी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

प्रभासने अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं होतं की, त्याचं स्वप्न आहे की, एक दिवस त्याला बॉलिवूडचे बादशाह अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करावं लागेल. नुकतीच बाहुबली फेम अभिनेत्याची ही इच्छा पूर्ण झाली. प्रभासने त्याच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. अमिताभ बच्चन यांचा फोटो पोस्ट करत त्याने लिहिलंय की, 'हे माझ्यासाठी एक स्वप्न पूर्ण झालं आहे. आज दिग्गज अमिताभ बच्चन सरांसोबत #ProjectK चा पहिला शॉट पूर्ण झाला'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अमिताभ बच्चन यांनीही ट्विट करून प्रभास आणि त्याचा आगामी चित्रपट 'प्रोजेक्टके'चं कौतुक केलं, अमिताभ बच्चन यांनी पोस्ट शेअर करत लिहीलं की, 'पहिला दिवस.. पहिला शॉट.. 'बाहुबली' प्रभाससोबतचा पहिला चित्रपट.. आणि त्याच्या कंपनीच्या सिनेमात त्याच्यासोबत मी असणं हा एक सन्मान आहे. प्रतिभा आणि त्याची अत्यधिक विनम्रता.. शिकण्यासाठी आत्मसात..!!'

या चित्रपटात सुपरस्टार प्रभासशिवाय दीपिका पदुकोण देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. मात्र, या चित्रपटा संबंधित इतर कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. अमिताभ बच्चन आणि प्रभास यांना एकत्र पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.