बाहुबलीचे दिग्दर्शक एस.एस. राजामौली आणि कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह

कोरोनाची लक्षणं नसल्याने एस.एस राजामौली हे सध्या होम क्वारंटाईन आहेत.

Updated: Jul 29, 2020, 09:50 PM IST
बाहुबलीचे दिग्दर्शक एस.एस. राजामौली आणि कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह title=

मुंबई : बाहुबली आणि बाहुबली-2 चे दिग्दर्शक एस.एस. राजामौली हे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांना आणि त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना ताप आला होता. त्यानंतर त्यांनी कोरोना टेस्ट करण्याचा निर्णय घेतला. ज्यामध्ये ते कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. राजामौली यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून ट्विट करुन चाहत्यांना ही माहिती दिली आहे.

राजामौली यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, "मला आणि माझ्या कुटुंबाला काही दिवसांपासून ताप येत आहे. हळूहळू तो कमी झाला पण आम्ही चाचणी केली. ज्यामध्ये आम्ही सौम्य कोरोना पॉझिटिव्ह आलो. पण आम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरी क्वारंटाईन आहोत. सध्या आम्हाला कोणतीही लक्षणे दिसत नाहीत आणि बरे वाटत आहेत, परंतु तरीही आम्ही काळजी घेत असून सूचनांचे पालन करीत आहोत."

"आम्ही अँटीबॉडी विकसित होण्याची वाट पाहत आहोत जेणेकरुन आम्ही प्लाझ्मा दान करू शकू." असं ही त्यांनी म्हटलं आहे. 

राजामौली हे सध्या ‘आरआरआर’ चित्रपटावर काम करत आहेत. चित्रपटात एनटी रामा राव ज्युनियर मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय रामचरण, आलिया भट्ट, अजय देवगण आणि श्रेया सरन महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसतील.