संजय मोने नाही तर हा होता सुकन्या मोनेंचा पहिला क्रश? लग्नाच्या 25 वर्षांनंतर सोडलं मौन

Sukanya Mone First Crush: सुकन्या मोने या आघाडीच्या अभिनेत्री आहेत आणि सोबतच त्यांच्या अभिनयाचीही चांगलीच चर्चा होताना दिसते. सध्या त्यांनी आपल्या एका मुलाखतीतून आपल्या पहिल्या क्रशबद्दल सांगितले आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Jul 11, 2023, 07:09 PM IST
संजय मोने नाही तर हा होता सुकन्या मोनेंचा पहिला क्रश? लग्नाच्या 25 वर्षांनंतर सोडलं मौन title=
July 11, 2023 | baipan bhari deva actress sukanya mone tells about her first crush was anil kapoor

Sukanya Mone First Crush; 'बाईपण भारी देवा' हा चित्रपट सध्या सर्वत्र तूफान गाजतो आहे. या चित्रपटातील सर्वांच्या भुमिकांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. त्यातील सुकन्या मोने यांची भुमिकाही प्रचंड गाजते आहे. प्रत्येकाचाच एकतरी क्रश आपल्या आयुष्यात असतो. तसाच आपला एक अनुभव या एका दिग्गज अभिनेत्रीनं सांगितला आहे. अभिनेत्री सुकन्या मोने यांनी आपल्या पहिल्या क्रशबद्दल नुकतच एका मुलाखतीतून सांगितले आहे. सुकन्या मोने या लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्या गेली अनेक वर्षे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत. अनेक लोकप्रिय नाटक, मालिका आणि चित्रपटांतून त्यांनी कामं केली आहेत. त्यांच्या अनेक भुमिका या गाजल्या असून त्यांच्या अभिनयाचे सगळेच वेडे आहे. यावेळी त्यांच्या 'बाईपण भारी देवा' या चित्रपटातील भुमिकेनं अक्षरक्ष: चार चांद लावले आहेत. 

नुकत्याच 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी खुलासा केला आहे. यावेळी आपल्या पहिल्या क्रशबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की, ''अनिल कपूर माझं पहिल क्रश होता. माझा पहिला चित्रपट ‘ईश्वर’. कॅमेऱ्यासमोर जाण्याची माझी पहिलीच वेळ. या चित्रपटात मी अनिल कपूरबरोबर काम केलं होतं. आणि नेहमीचा एक क्रश आहे तो म्हणजे अमिताभ बच्चन.” त्यांनी आपल्या क्रशसोबतच पहिल्या चित्रपटातून काम केले होते. त्यामुळे त्यांच्यासाठी ही एक मोठी फॅन मुमेंट होती. 

ऑलटाईम क्रशबद्दलही बोलताना त्या म्हणाल्या की ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन म्हणजेच बिग बी हे त्यांचे ऑलटाईम फेवरेट अभिनेते आणि क्रश आहेत. सध्या त्यांच्या या पहिल्या क्रशच्या आठवणीची सर्वत्र चर्चा होताना दिसते आहे. काही दिवसांपुर्वी त्यांचे पती आणि लोकप्रिय अभिनेते संजय मोने यांनी या चित्रपटाबद्दल एक खास पोस्ट लिहिली होती.

हेही वाचा - आदेश बांदेकर यांनी विवाहबाह्य संबंध ठेवले तर? सुचित्रा बांदेकर म्हणतात, ''तर मी..."

या चित्रपटातून जुलिया मोने हिनंही अभिनय केलेला आहे. त्यामुळे तिच्या अभिनयाचेही सर्वत्र कौतुक होताना दिसते आहे. यावेळी सुकन्या मोने आणि जुलिया मोने या दोघी मायलेकी या चित्रपटातून दिसत आहेत. त्यामुळे त्यांच्या अभिनयाचीही चांगलीच चर्चा रंगलेली आहे. 'बाईपण भारी देवा' या चित्रपटानं आत्तापर्यंत 26 कोटीहून अधिक गल्ला भरला आहे. पहिल्या आठवड्यात या चित्रपटानं 6.45 कोटींचा गल्ला भरला होता त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात या चित्रपटानं 12.50 कोटींचा गल्ला भरला आहे. सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शरद पोंक्षे, तुषार दळवी, सुरूची अडारकर, पियूष रानडे, रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, शिल्पा नवलकर, दिपा चौधरी यांच्या भुमिकेचे प्रचंड कौतुक करण्यात आले आहे.