अमिताभ बच्चन यांच्या 'जलसा' बंगल्यात घडली 'ही' भयंकर घटना; जाणून तुम्हालाही बसेल धक्का

बीग बी अमिताभ बच्चन हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एव्हरग्रीन अभिनेते आहेत. 

Updated: Oct 11, 2022, 05:55 PM IST
अमिताभ बच्चन यांच्या 'जलसा' बंगल्यात घडली 'ही' भयंकर घटना; जाणून तुम्हालाही बसेल धक्का title=

मुंबई : बीग बी अमिताभ बच्चन हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एव्हरग्रीन अभिनेते आहेत. ते आपल्या अभिनयाव्यतिरिक्त सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असतात. आपल्या दैनंदिन जीवनातील अनेक रंजक गोष्टी आणि घटना ते सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असतात. तसंच त्याविषयी त्यांच्याकडून सल्ले घेत असतात. नुकतेच अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या घरातील एक भयावह घटना सांगितली. यामुळे घरातील मंडळी खूपच घाबरून गेल्याचंही त्यांनी सांगितलं होतं.

जेव्हापासून कारोना लागवडीची सुरुवात झाली होती तेव्हापासूनच कोरोना व्हायरस बद्दल बातम्या येत होत्या की, वटवाघुळांच्या माध्यमातून हा वायरस मानवांमध्ये पसरतो. ही बातमी आल्यापासून लोक वटवाघळांच्या बाबतीत खूप सावध आहेत. आता अशा परिस्थितीत तुमच्या घरात वटवाघुळ शिरलं आणि ते जायचं नावच घेत नसेल तर? कदाचित या गोष्टीचा विचार केल्यानं तुम्हालाही भीती वाटेल. बॉलीवूडचे बादशाह अमिताभ बच्चन यांच्याबाबतीत नेमकं हेच घडलं आहे. हा किस्सा जरी जुना असला तरी बीग बींच्या वाढदिवसानिमीत्त त्यांचा हा किस्सा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 

अमिताभ यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली होती. या ट्वीटमध्ये त्यांनी सांगितलं की, त्यांच्या जलसा बंगल्यातील एका खोलीत वटवाघुळ घुसलं, जे बाहेर काढण्यात त्यांना खूप अडचणींचा सामना करावा लागला. अमिताभ यांनी ट्विट केलं होतं की, 'बंधू आणि सज्जनांनो, आजची बातमी... ब्रेकिंग न्यूज... जलसाच्या तिसर्‍या मजल्यावरील माझ्या खोलीत वटवाघुळ घुसलं यावर तुमचा विश्वास बसेल का? त्यांनी मोठ्या कष्टाने ते बाहेर काढलं. कोरोना पाठलाग सोडत नाहीये. हे ट्वीट फार जुनं आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी हा किस्सा बीग बींच्या बंगल्यावर घडला होता.

अमिताभ बच्चन सोशल मीडियावर सतत सक्रिय असतात. अनेकदा ते त्यांच्या आयुष्याशी आणि करिअरशी संबंधित काही गोष्टी ट्विटरवर पोस्ट करत असतात. त्यांची प्रत्येक पोस्ट त्याच्या चाहत्यांना खूप आवडते.