Batman Actor Kevin Conroy Dies: लोकप्रिय अभिनेता आणि व्हॉईस-ओव्हर आर्टिस्ट कलाकार केविन कॉनरॉय (Kevin Conroy) यांनी बॅटमॅन अॅनिमेटेड मालिकेतील त्यांच्या व्हॉईस-ओव्हरसाठी प्रसिद्ध आहे. केविन यांच्या आवाजानं बॅटमॅनचं पात्र सगळ्यांच्या लक्षात राहिलं. याच केविन यांचे वयाच्या 66 व्या वर्षी निधन झाले आहे. (Kevin Conroy Death) केविन हे दीर्घकाळापासून कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी झुंज देत होते. केविन यांच्या निघनाची बातमी केविनसोबत 'बॅटमॅन: द अॅनिमेटेड सीरीज'मध्ये काम करणाऱ्या डियान पर्शिंगनं दिली आहे. यासोबतच वॉर्नर ब्रदर्स अॅनिमेशननेही याची पुष्टी केली आहे.
वॉर्नर ब्रदर्स यांनी सोशल मीडियावर केविन यांच्या निधनाची बातमी शेअर करत याची पुष्टी केली आहे. केविन यांचा सहकलाकार मार्क हॅमिल म्हणाले, 'केविन एक परफेक्शनिस्ट होता. या संपूर्ण जगात तो माझा आवडता व्यक्ती होता आणि तो माझ्यासाठी भावासारखा होता. आजूबाजूच्या लोकांची त्याला मनापासून काळजी होती. तो जे काही करत असे, त्यात काही तरी तथ्य नक्कीच असायचे. मी जेव्हा त्याला बघायचो, बोलायचो तेव्हा एक वेगळाच उत्साह भरून यायचा.' 'बॅटमॅनः द अॅनिमेटेड सिरीजचे लेखक पॉल डिनी यांनीही बॅटमॅनचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून केविन यांना श्रद्धांजली वाहिली आहे. (batman voice over artist kevin conroy dead at age of 66 due to cancer)
केविन कॉनरॉय यांनी आपल्या करिअरची सुरुवात 80 च्या दशकात केली होती. थिएटरमधील त्यांचा अभिनय आणि आवाजाचे नेहमीच कौतुक करण्यात येत होते. 1992 मध्ये, त्यानं सगळ्यात आधी बॅटमॅनच्या पात्राला आपला आवाज दिला. ही सीरिज खूप गाजली. 'बॅटमॅन: द अॅनिमेटेड' सिरीजमध्ये, त्याच्या आवाजाने लाखो लोकांवर बॅटमॅनच्या पात्राची छाप सोडली.