उर्वशी रोतेलाचे ब्युटी सिक्रेट्स...

हेट स्टोरी ४ मध्ये आपल्या हॉट अदांनी सर्वांना घायाळ करणारी अभिनेत्री उर्वशी रोतेला हीचे सौंदर्यही काही कमी नाही.

Updated: Mar 3, 2018, 08:55 AM IST
उर्वशी रोतेलाचे ब्युटी सिक्रेट्स... title=

मुंबई : हेट स्टोरी ४ मध्ये आपल्या हॉट अदांनी सर्वांना घायाळ करणारी अभिनेत्री उर्वशी रोतेला हीचे सौंदर्यही काही कमी नाही. ती इतकी सुंदर कशी? आपले सौंदर्य राखण्यासाठी ती नेमके काय करते, पाहुया...

सौंदर्याबद्दल सजग असणे महत्त्वाचे

उत्तराखंडची असलेली उर्वशी ही लहानपणापसूनच सामान्य कौटुंबिक वातावरणात वाढली आहे. तिच्या आईने सांगितले की, उर्वशी पहिल्यापासूनच स्वतःबद्दल, तिच्या सौंदर्याबद्दल, फिटनेसबद्दल सजग आहे.

म्हणूनच तिने जंक फूड खाणे पूर्णपणे सोडून दिले आहे. अगदी काही चमचमीत खाण्याची तिची इच्छा झाली तर ती घरी बनवून खाते. कारण बाहेरचे खाद्यपदार्थ आरोग्यासाठी हानिकारक असतात, असे तिचे मानणे आहे. म्हणून घरचे अन्न घेणे ती पसंद करते.

आहार आणि व्यायाम

उर्वशीची आई मीरा रोतेला यांनी सांगितले की, उर्वशी पाण्यापासून अगदी जेवणापर्यंत सर्व घरचे खाणे पसंद करते. ती आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे यांचा आर्वजून समावेश करते. त्याचबरोबर नियमित व्यायाम हे ही तिच्या सौंद्याचे गुपित आहे.