close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

महिला दिग्दर्शकासोबत काम करणं अधिक सोपं - दीया मिर्जा

'काफिर' मधील भूमिका करियरमधील सर्वात आव्हानात्मक भूमिका असल्याचं दीयाने म्हटलंय.

Updated: Apr 26, 2019, 12:08 PM IST
 महिला दिग्दर्शकासोबत काम करणं अधिक सोपं - दीया मिर्जा

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दीया मिर्जा वेबसीरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दीया मिर्जाने सोनम नायर दिग्दर्शित 'काफिर' या वेबसीरीजचं शुटिंग पूर्ण केलं आहे. यादरम्यान दीयाने महिला दिग्दर्शकासोबत काम करणं अधिक सहज, सोयीस्कर आणि फायद्याचं असल्याचं म्हटलंय. 'काफिर' मधील भूमिका करियरमधील सर्वात आव्हानात्मक भूमिका असल्याचं दीयाने सांगितलंय. 'काफिर'मध्ये दीयासह अभिनेता मोहित रैना दिसणार आहे. 'काफिर'च्या शुटिंगचा पहिला टप्पा हिमाचल प्रदेशमध्ये चित्रित करण्यात आला आहे. 

 
 
 
 

A post shared by Dia Mirza (@diamirzaofficial) on

'महिला दिग्दर्शकाशी कामं करणं अधिक सहज, सोपं होतं. काम करताना एकमेकांना अधिक चांगल्याप्रकारे ओळखू शकतो. महिला दिग्दर्शकासोबत अधिक स्वाभाविकपणे वागणूक होत असते. दिग्दर्शक सोनम नायरच्या रुपात मला बहिण मिळाली. ती कामाला अधिक मजेशीर करत असल्याचं' दीयाने म्हटलंय. 'काफिर'साठीच्या पहिल्या टप्प्यातील अनुभव अतिशय सुंदर होता. मला अनेक लोकांशी भेटण्याची तसंच त्यांच्याकडून खूप काही शिकण्याची संधी मिळाली. हिमाचलमधील स्थानिक लोकांची 'काफिर'च्या संपूर्ण यूनिटमधील सदस्यांशी वागणूक अतिशय जवळची होती. स्थानिक लोकांनी आम्हाला चविष्ट जेवणही दिलं. या थंड प्रदेशात आम्ही वातावरणाचा आनंद घेतला' असल्याचं तिने म्हटलंय.

 
 
 
 

A post shared by Dia Mirza (@diamirzaofficial) on

याआधी दीया 'संजू' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. त्यानंतर आता वेबसीरीजमधून ती प्रेक्षकांसमोर येणार आहे. सिद्धार्थ मल्होत्रा निर्मित 'काफिर'चं दिग्दर्शन सोनम नायरने केलं आहे. 'काफिर' झी५ वर दाखवण्यात येणार आहे. 'वैयक्तिकरित्या, माझ्यासाठी कोणतंही पात्र साकारताना त्याला ओळखणं अतिशय आवश्यक आहे. पात्राचा सखोल अभ्यास करण्यासाठी वर्कशॉप फायदेशीर ठरतें. जी भूमिका साकारायची आहे त्यासाठी त्या भूमिकेचा शोध घेणं गरजेचं असल्याचं' दीयाने म्हटलं आहे. 'काफिर'मध्ये मी साकारत असलेली भूमिका अतिशय आव्हानात्मक असून अशा सत्य घटनेवर आधारित असलेल्या गोष्टीचा मी एक भाग असल्याने स्वत:ला भाग्यवान समजत असल्याचं तिने म्हटलंय.