आलियाच्याआधी रणबीर 'या' अभिनेत्याच्या पत्नीला करायचा डेट

बॉलिवूडमधील रणबीरच्या या नात्याची सर्वत्र चर्चा 

Updated: Sep 28, 2021, 02:30 PM IST
आलियाच्याआधी रणबीर 'या' अभिनेत्याच्या पत्नीला करायचा डेट

मुंबई : अभिनेता रणबीर कपूर सध्या बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी आहे. 'सावरिया' चित्रपटाच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या रणबीर कपूरची खासगी आयुष्य देखील कायम चर्चेत असतो. सध्या अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर एकमेकांना डेट करत आहेत. गेल्या काही वर्षांपासून दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत.  पण धक्कादायक गोष्ट म्हणजे रणबीर बॉलिवूड अभिनेचा इमरान खानची पत्नी अवंतिका मलिकला डेट करत होता. 

Deepika ranbir

अवंतिका रणबीरला फार आवडायची. तो अवंतिकाला टीव्ही सेटवर सोडायला देखील जायचा. रिपोर्टनुसार जवळपास एकमेकांना पाच वर्षांपेक्षा जास्त काळ डेट केलं. पण अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अनेक अभिनेत्रींसोबत रणबीरचं नाव जोडण्यात आलं. त्यापैकी अभिनेत्री दीपिका पादुकोन आणि अभिनेत्री कतरिना कैफला देखील रणबीरने डेट केलं.

Ranbir kapoor

आता सध्या रणबीर आणि आलिया रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघांना अनेकदा कार्यक्रम, पार्टी स्पॉट करण्यात आलं आहे. शिवाय दोघे सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी परदेशी जातात...