मुंबई : कौन बनेगा करोडपतीच्या ९ व्या सिझनने अनेक लोकप्रिय कार्यक्रमाचे टीआरपी रेकॉर्ड्स मोडले आहे.
रोजच केबीसी ९ ही बातम्यांचा एक विषय बनते.
नुकताच प्रदर्शित झालेल्या केबीसीच्या भागात गायिका उषा उत्तप आणि ट्रान्सजेंडर अॅक्टीव्हिस्ट गौरी सावंत आल्या होत्या. 'नई चाह नई राह' या केबीसीमधील एका खास भागात गौरी सावंत यांनी समलैंगिक लोकांच्या समस्यांवर भाष्य केले तर उषा उत्तप यांनी अमिताभ बच्चन यांच्या काही जुन्या आठवणींना उजाळा दिला.
काही वर्षांपूर्वी अमिताभ बच्चन कोलकत्यामध्ये एका फर्ममध्ये नोकरी करत होते. कोलकत्यामध्ये असताना माझा शो पहायला अमिताभ यायचे. यादरम्यान आमची ओळख झाल्याची माहितीदेखील उषा उत्तप यांनी दिली. त्यानंतर १९७२ साली आलेली 'बॉम्बे टू गोवा' मध्ये अमिताभ आणि उषाजींना एकत्र काम करायला कसे मिळाले यामागची गोष्टही त्यांनी सांगितली.
उषा उत्तप आणि गौरी सावंत यांनी मिळून केबीसीमध्ये २५ लाख रूपये जिंकले. या एपिसोडमध्ये 'एकला चलो रे' गाणं गाताना उषा उत्तप यांच्यासोबत बीग बींनीही सुरात सूर मिसळला.